Vande Bharat Express :अहमदनगर, दि.26 मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वाकांक्षी (फ्लॅगशिप )कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
बैठकीस राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याने 651 कोटी रुपये खर्च करत 1 हजार 35 गावांमधून 32 हजार कामांद्वारे 2 लक्ष 98 हजार हेक्टर जमीन संरक्षित सिंचनाखाली आली आहे. या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात यश मिळाले आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा 2 मध्ये जिल्ह्यातील 257 गावांची निवड करण्यात आली आहे. टप्पा दोन मधील कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार करावा. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये लोकसहभाग वाढवत कामांना अधिक गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आता मोदी आवास योजना सुरू करण्यात येत आहे.
या योजनेसह शबरी, रमाई, प्रधानमंत्री आवास योजना एकत्रित करून १० लाख घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिल्ह्याने त्यांचे उद्दिष्ट वाढवून समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन पात्र गरजूंना लाभ देण्यासाठी मोहीम राबवावी, असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वसामान्यांना विविध दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन महिन्यात जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठीच्या योजना पोहोचवायच्या असुन जिल्ह्याचे दीड लक्ष दाखले वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
मे महिन्यातील प्रवासी क्षमता प्रतिसाद
ट्रेन क्षमता प्रतिसाद १०० टक्के प्रतिसाद
सीएसएमटी-साईनगर शिर्डी ९३ टक्के २० मे १००.७९ टक्के
साईनगर शिर्डी-सीएसएमटी ८४ टक्के २१ मे १०३.६३ टक्के
सीएसएमटी-सोलापूर ११९.४५ टक्के १२ मे १३३.०६ टक्के
सोलापूर-सीएसएमटी १२५.२३ टक्के २ मे १५१.२४ टक्के
नागपूर-बिलासपूर ९५.०८ टक्के १९ मे १३३.३९ टक्के
बिलासपूर-नागपूर ९७.९२ टक्के २३ मे १३७.५४ टक्के