Vande Bharat Express : वंदे भारत ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन रुळावर आली. अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला ४ वर्षे पूर्ण झाली. आलिशान आणि उच्च दर्जाच्या सोयीसुविधांसह देशभरात आतापर्यंत २४ वंदे भारत ट्रेन रुळांवर धावत असून या ट्रेन्सची निर्मितीदेखील जलदगतीने सुरू आहे. या ट्रेनमुळे देशाच्या दळणवळण क्षेत्रात कमालीची क्रांती घडली आहे.
नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावलेल्या पहिल्या ट्रेननंतर सद्यस्थितीत २६ ट्रेनद्वारे १७ राज्यांतील १०८ जिल्हे वंदे भारत ट्रेनशी जोडले गेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय आणि चर्चेच्या विषय ठरत आहेत, त्या महाराष्ट्रात धावणाऱ्या सीएसएमटी-साईनगर शिर्डी- सीएसएमटी आणि सीएसएमटी- सोलापूर-सीएसएमटी या दोन वंदे भारत ट्रेन. या गाड्यांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे आणि लांब पल्ल्याचा मार्ग जलद गतीने जोडण्यात आल्याने अल्प काळातच या गाड्या प्रवाशांच्या पसंतीच्या ठरल्या आहेत.
दरम्यान, या गाड्यांमध्ये विमान प्रवासाचा अनुभव आणि कवच तंत्रज्ञानासह प्रगत अत्याधुनिक सुरक्षा सुविधा असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत यापैकी ट्रेन क्रमांक २२२२३/ २२२२४ मुंबई-साईनगर शिर्डी मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याण येथे आणि ट्रेन क्रमांक २२२२५/ २२२२६ मुंबई – सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून धावणाऱ्या मुंबई-शिर्डी आणि मुंबई- सोलापूर वंदे भारत ट्रेनना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार मुंबई – साईनगर शिर्डी मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याण येथे आणि मुंबई – सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार ४ ऑगस्टपासून ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात येणार आहे.
ठाणे, कल्याण येथे दिलेले थांबे आणि त्यांची वेळ
सीएसएमटी ते साईनगर शिर्डी (२२२२३)
सकाळी ६.२० सीएसएमटी
सकाळी ६.३० दादर
सकाळी ६.४९ – ठाणे
सकाळी ७.११ कल्याण
सकाळी ८.५७ – नाशिक
सकाळी ११.४० – साईनगर शिर्डी
साईनगर शिर्डी ते सीएसएमटी (२२२२४) :
सायंकाळी ५.२५ – साईनगर शिर्डी
सायंकाळी ७.२५ – नाशिक
रात्री ९.४५ – कल्याण
रात्री १०.०६ – ठाणे
रात्री १०.२८ – दादर
रात्री १०.५० – सीएसएमटी
सीएसएमटी ते सोलापूर (२२२२५) :
दुपारी ४.०५ – सीएसएमटी
दुपारी ४.१५ – दादर
दुपारी ४.३३ – ठाणे
सायंकाळी ४.५३ कल्याण
सायंकाळी ७.१० पुणे
रात्री ९.३६ – कुर्डुवाडी
रात्री १०.४० सोलापूर
सोलापूर ते सीएसएमटी (२२२२६) :
सकाळी ६.०५ – सोलापूर
सकाळी ६.५३ – कुर्डुवाडी
सकाळी ९.१५ – पुणे
सकाळी ११.३३- कल्याण
दुपारी ११.५० – ठाणे
दुपारी १२.१२ – दादर
दुपारी १२.३५ – सीएसएमटी