Vande Bharat Train:- मुंबई म्हटले म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आहेच परंतु देशाच्या आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईला भारतामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या ठिकाणी असलेली प्रचंड लोकसंख्या व त्या दृष्टिकोनातून पायाभूत सोयी सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेता मुंबईमध्ये अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत.
त्यामध्ये विविध रस्ते प्रकल्प तसेच उड्डाणपूल, मेट्रोचे जाळे विकसित करण्याकरिता मेट्रो मार्गांचे सुरू असणारे काम या माध्यमातून मुंबईमधील वाहतुकीची समस्या म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराची देशातील इतर शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे
यामध्ये आपण मुंबई ते दिल्ली एक्सप्रेसवेचा यामध्ये समावेश करू शकतो. त्यासोबतच वंदे भारत ट्रेनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत आहेत.मुंबईचा विचार केला तर मुंबईमधून शिर्डी,
सोलापूर तसेच गोव्याकरिता वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. व्यतिरिक्त मुंबईला अजून दोन स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. याच स्लीपर वंदे भारत ट्रेनचा रूट कसा असणार आहे? याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
मुंबईला मिळतील दोन स्लीपर वंदे भारत ट्रेन
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या प्रवासांच्या माध्यमातून वंदे भारत ट्रेनला जो काही प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केल्या जातील यासंबंधीचे चर्चा अनेक दिवसांपासून आहे. यामध्ये आनंदाची बातमी अशी की पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन ही मुंबईहुन धावणार असल्याचे सांगितले जात होते व अखेर मुंबईकरांचे हे स्वप्न लवकरात पूर्ण होण्याची शक्यता असून येणाऱ्या मार्च महिन्यात ही वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी केव्हाही हजर होण्याची शक्यता आहे.
मुंबईवरून कोणत्या ठिकाणी धावणार ही वंदे भारत ट्रेन?
जर आपण मुंबईमधून सुरू होणाऱ्या या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा रूट पाहिला तर तो मुंबई ते राजस्थान राज्यातील जोधपुर आणि मुंबई ते दिल्ली या मार्गांवर ही ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात मुंबईकरांना राजस्थान आणि दिल्लीचा प्रवास करणे खूप सोपे जाणार आहे.
किती असणार तिकीट दर?
नव्याने सुरू होत असलेल्या या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा विचार केला तर या गाडीचे भाडे हे राजधानी एक्सप्रेसपेक्षा 20 टक्क्यांनी अधिक राहणार असल्याचे बोलले जात आहे तसेच ही वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईमधून धावणारी संपूर्णपणे एअर कंडिशनर म्हणजेच वातानुकूलित ट्रेन असणार आहे.
तसेच या स्लीपर ट्रेनमध्ये अनेक हायटेक आणि महत्वाचे असे फिचर राहणार असून प्रवाशांसाठी यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत व त्यामुळे प्रवाशांचा प्रवास खूप सुखकर होण्यास मदत होणार आहे.