Vande Bharat Train News:- केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेले असून अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रमाणात वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
तसेच येणाऱ्या कालावधीत देशातील अनेक तीर्थक्षेत्र देखील वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते मडगाव गोवा, नागपूर ते बिलासपुर इत्यादी मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून या मार्गांवरील वंदे भारतला प्रवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये देखील मुंबई ते शेगाव ही वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची सरकारची योजना आहे. अगदी याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिले तर मराठवाड्यासाठी महत्त्वाचे ठरेल अशी जालना ते मुंबई या मार्गावर देखील जानेवारीपर्यंत वंदे भारत ट्रेन धावेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जानेवारीत धावणार जालना ते मुंबई वंदे भारत
सध्या जर आपण पाहिले तर वंदे भारत एक्सप्रेस काही मोजक्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या असून ही रेल्वे गाडी जालना ते मुंबई मार्गावर देखील जानेवारी धावणार आहे. परंतु त्याची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु या बाबतीत दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी मंगळवारी जालना रेल्वे स्थानकावरील विद्युत पुरवठा तसेच इतर महत्त्वाच्या सोयी सुविधांची पाहणी केली.
जर आपण सध्या दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाचा विचार केला तर या विभागातील सर्वात जास्त कामे जालना रेल्वे स्टेशनवर सुरू आहेत. त्यामुळे जालना सारख्या शहरातून वंदे भारत मॉडेल गाडी थांबणार आहे. या ट्रेन करता ज्या काही सोयी सुविधा लागतात त्याकरिता आवश्यक सोयी सुविधांची चाचपणी देखील सुरू करण्यात आलेली आहे.
यामध्ये जालना रेल्वे स्टेशनची पाहणी विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी केली. जी कामे अपूर्ण आहेत त्या कामांची पाहणी करून तातडीने ते पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वंदे भारत एक्सप्रेस जालना ते मुंबई या मार्गावर धावणार आहे व यासाठी लागणाऱ्या उपयुक्त सोयी सुविधा यामध्ये लाईट,
पाणी तसे इतर यंत्रणा आदींची चाचपणी सध्या सुरू आहे. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या वर्षात जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या रूपाने नवीन वर्षाची चांगली भेट मिळण्याची शक्यता आहे. हे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वेच्या प्रशासनाकडून देखील जोरदार तयारी सुरू आहे.
यामध्ये रोलिंग ब्लॉकचे काम चालू असल्याने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारी 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जालना ते मुंबई रेल्वे सुरू झाल्यानंतर या दरम्यानचा प्रवासामध्ये दीड तासांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.