Ahmednagar Pune Road Change : भिमा-कोरेगाव जवळील पेरणे फाटा येथील जय स्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे.
३१ डिसेंबर ते २ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत हे फेरबदल असतील. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी तशा प्रकारचे आदेश पारित केले आहे.
नगरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक व्यवस्था कायनेटीक चौक, अरणगाव बायपास, बेलवंडी, काष्टी, दौंड, सोलापूर-पुणे महामार्गे पुण्याकडे जातील.
तसेच बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारी वाहने बेलवंडी फाटा- देवदैठण, ढवळगाव ,पिंप्री कोलदर- उक्कडगाव-बेलवंडी-अहमदनगर दौंड महामार्गावरुन – लोणी व्यंकनाथ मढे वडगाव काष्टी-दौंड-सोलापुर पुणे मार्गे पुणेकडे जातील.
अहमदनगरकडून पुणेमार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक कल्याण बायपास आळेफाटा-ओतुर-माळशेज घाट मार्गे जातील. बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हा आदेश शासकीय वाहने, पेरणे येथे जय स्तंभास मानवंदना व अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांची वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व आवश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.