महाराष्ट्र

विठूमाऊलीच्या दर्शनाला पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; ४ वारकऱ्यांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी

सोलापूर : विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur) निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा (Tractor) सोलापूर (Solapur) येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

तसेच या अपघातात ६जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.

मृतांमध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून हे सर्व प्रवासी तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील कदमवाडी गावातील रहिवाशी असून एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur Highway) कोंडी गावजवळ हा अपघात झाला आहे.

मालट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच ट्रॅक्टरमध्ये एकूण २२ प्रवासी होते. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवाशी आहेत.

दरम्यान, अपघाताला कारणीभूत असलेल्या व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी केली आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts