महाराष्ट्र

Volkswagen Tiguan 2023 : बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी स्टाइलिश Tiguan कार सज्ज, नवीन बदलांसह ह्युंदाई क्रेटाला देणार टक्कर

Volkswagen Tiguan 2023 : Volkswagen India ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत नवीन अवतारात आपली सर्वोत्तम कार लॉन्च केली आहे. ही कार Tiguan असून आता या कारमध्ये नवीन बदल पाहायला मिळणार आहेत.

यासोबतच कंपनीने या कारमध्ये खूप चांगल्या फीचर्ससह जबरदस्त पॉवरट्रेन दिली आहे. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स देखील पाहायला मिळतील. कंपनीची ही कार ह्युंदाई क्रेटाला टक्कर देऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे. या कारचा लूकही खूपच स्टायलिश देण्यात आला आहे.

Volkswagen Tiguan 2023 Features

फ्लॅगशिप SUV Tiguan फोक्सवॅगनने अपडेट केली आहे. नवीन टिगुआनला नवीन ड्युअल टोन इंटीरियर तसेच वायरलेस चार्जर आणि RDE अनुरूप इंजिन मिळते. यात वायरलेस चार्जर, एलईडी मॅट्रिक्स लाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 20.32 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, झेस्टर कंट्रोल, प्रगत रिव्हर्स कॅमेरा, 615 लीटर बूट स्पेस, अॅम्बियंट लाइट्स, टच आणि स्लाइड एसी कंट्रोल्स यांसारख्या वैशिष्ट्यांसह ड्युअल टोन स्टॉर्म ग्रे इंटिरियर्स मिळतात. .

Volkswagen Tiguan 2023 Safety Features

या कारमध्ये तुम्हाला सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये देखील पाहायला मिळतील. यात मागील सीट बेल्ट रिमाइंडर, सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईएससी, एएसआर, ईडीएल, ईडीटीसी, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, अॅक्टिव्ह टीपीएमएस, मागील बाजूस तीन हेडरेस्ट, तीन पॉइंट सीटबेल्ट, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज तसेच लेव्हल-1 यांचा समावेश आहे. ADAS आणि पार्क असिस्ट सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Volkswagen Tiguan 2023 Powertrain

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या कारमध्ये 2-लिटर टर्बोचार्ज केलेले TSI इंजिन दिले आहे. हे इंजिन 190 पीएस आणि 320 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

एसयूव्हीमध्ये सेव्हन स्पीड डीएसजी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ज्यासोबत फोर व्हील ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आली आहे. SUV चे हे इंजिन RDE अनुरूप आहे आणि आता SUV ला सात टक्के जास्त सरासरी मायलेज मिळते.

Volkswagen Tiguan 2023 Price

कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 34.69 लाख रुपये ठेवली आहे. म्हणूनच जर तुम्हालाही चांगली कार घ्यायची असेल, तर फोक्सवॅगनची ही आलिशान कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts