Maharashtra news : संपूर्ण देशात आता शेती क्षेत्रात (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकाला फाटा देऊन वेगवेगळ्या नगदी पिकांची शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा देखील होत आहे.
नागपूर मध्ये (Nagpur) देखील मौदा तालुक्यातील एका शेतकऱ्याने काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे घेतले आहे. तालुक्यातील मौजे खंडाळा येथील आनंदकिशोर येरल्लागड्डा नामक शेतकऱ्याने काळाच्या ओघात शेती व्यवसायात बदल करीत केळीची लागवड (Banana Farming) केली आहे.
आनंद किशोर यांनी आपल्या 10 एकर शेतात केळीची बाग (Banana Orchard) लावली आहे. आधुनिक पद्धतीने आनन्द किशोर यांनी सुरू केलेले केळीची शेती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
मित्रांनो विदर्भातील मौदा तालुका हा खर पाहता संपूर्ण राज्यात धानाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. तालुक्यातील निम्म्याहून अधिक शेतकरी बांधव पारंपरिक पिकाला पसंती देत असतात. मात्र असे असले तरी काही शेतकरी हंगामी पिकाच्या लागवडीसाठी पुढे सरसावले आहेत.
शेतकरी बांधव आता भाजीपाला लागवड आता मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. आनंदकिशोर देखील भाजीपाला लागवड करतात शिवाय याच्या जोडीला केळीची बाग लावली आहे. त्याच्याकडे 10 एकरची केळीची बाग आहे आणि बागकामासाठी ते अत्याधुनिक यंत्रांचा वापर करीत आहे.
यासाठी त्यांनी यानमार कंपनीचे अद्ययावत टेक्नॉलॉजीचे नवीन ट्रॅक्टर विकत घेतले आहे. आनन्द किशोर यांनी दावा केला आहे की, यानमार कंपनीचे हे नवीन टेक्नॉलॉजीचे ट्रॅक्टर घेणारे ते देशातील पहिले शेतकरी आहेत.
यामुळे या जपानी कंपनीचे ट्रॅक्टर पाहण्यासाठी त्यांच्या मळ्यात पंचक्रोशीतील इतर प्रगतशील शेतकरी दाखल होत आहेत. एवढेच नाही तर या कंपनीच्या जपानी अधिकाऱ्यांनी देखील आनन्द किशोर यांच्या मळ्याला सदिच्छा भेट दिली असून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
आनंद किशोर यांचा या जपानी कंपनीकडून सत्कार देखील करण्यात आला आहे. सत्कार म्हणुन आनन्द किशोर यांना रोख बक्षीस देखील यावेळी मिळाले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, यावेळी कंपनीचे उत्पादन प्रमुख धीरज शर्मा, कंपनीचे मार्केटिंग प्रमुख वर्मा,
तसेच यानमार कंपनीचे जपान येथील अधिकारी तत्सूया नकानिशी सान, मासाकाझू कोमात्सू सान, केशवमूर्ती सान, राधेश्याम पटले आदी प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी देखील यावेळी या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. निश्चितच आणि किशोर यांनी मिळवलेल्या या शेती व्यवसायातील यशामुळे शेतीचे महत्व अधोरेखित होण्यास मदत झाली आहे.