Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल शिर्डीत होते. भव्य सभा त्यांची पार पडली. यावेळी निळवंडे प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. परंतु आता यावरूनच आ. प्राजक्त तनपुरे यांनी मोठा घणाघात केला आहे.
काम पूर्ण नसतानाच निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. बहुतेक जिल्ह्यातील लोकांनी पंतप्रधानांना पूर्ण माहिती दिली नसावी असा घणाघात आ. तनपुरे यांनी केला आहे.
तनपुरे म्हणाले की, निळवंडे प्रकल्पांचे लोकार्पण मोठा गाजावाजा करून पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. डाव्या कालव्याकून पाणी सोडण्याचा कार्यक्रम होत असला तरी, उजव्या कालव्याचे काम अद्याप बाकीच आहे, अशी टिका त्यांनी केली.
आ. तनपुरे म्हणाले, ज्या प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे, तो प्रकल्पच पूर्ण नाही. डाव्या कालव्याला – पाणी सोडण्याचा कार्यक्रम करता पण उजव्या कालाव्याचे काम अपूर्ण आहे. धरणाच्या उजव्या कालव्याचा शेवट राहुरी तालुक्यात होतो.
पण अजूनही काही ठिकाणी वनविभागाची परवानगी नसल्याने काम सुरू झाले नाही. अशा अपूर्ण कामाचा लोकार्पण सोहळा होतोच कसा याचेच आश्चर्य वाटतेय असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले की आम्ही हे काम पूर्ण केले, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात धरणाच्या प्रकल्पाला जी गती मिळाली, ती यापूर्वी कधीच मिळाली नाही हे सर्वांसमोर आहे. महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वीच्या भाजप सरकारने पाच वर्षात जेवढा निधी दिला, तेवढा निधी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर दिला हे वास्तव आहे असे सांगत त्यांनी निळवंडेच्या लोकार्पण सोहळ्यावरून घणाघात केला.