Maharashtra news : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना बुधवारी सौम्य ताप आला होता म्हणून चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटीव आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
दरम्यान, इडीचे कालच नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी यांना नोटीस बाजवली असून ८ जूनला चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आता कोरोनाची लागण झाल्याने गांधी उपस्थित राहू शकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांसोबत सोनिया गांधींची बैठक होती. या बैठकीत उपस्थित असलेल्या काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर गांधी यांनी स्वतःला विलग केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.