अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- यवतमाळ मध्ये ट्रेडिंग अकाऊंट काढण्याच्या नावाखाली हार्डवेअर व्यवसायकाची दहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आलीया नामक व्यक्तीपासून हा धोका झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.(Whatsapp Fraud)
तर आता त्याचा फोन बंद असल्याने या व्यवसायिकांनी अखेर पोलिसात धाव घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असद जफर बॉम्बेवाला (४०) रा. शहीद सोसायटी स्टेटबँक चौक यवतमाळ असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे.
त्याच्या मोबाईल क्रमांकावर आलीया नामक व्यक्तीचा व्हाट्सअप मेसेज आला. त्यात असलेली लिंकच असद यांची फसवणूक होण्यास कारणीभूत ठरली.
लिंकवर क्लिक करताच आलीया नामक व्यक्तीने चॅटिंग सुरू केले. त्यावेळी असंद यांना ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम आलियाने सांगितलेल्या बँक खात्यात पाठवण्यात आली नोंदणी निश्चित झाल्याने असंद यांना सांगितले.
लगेच पाच लाख रुपये भरावे लागतील अशी सूचना करण्यात आली. ही रक्कमही असद त्यांनी पाठवली. यानंतर मात्र ते या जाळ्यात गुंतत गेले.
आर्थिक अडचण सांगत पैसे काढायचे असल्याने आलीयाला सांगितले, त्यावर त्यांनी अकाउंटमध्ये ट्रेडिंग चालू असल्याने आठवडाभर थांबावे लागेल, असे सांगितले. प्रत्येक वेळी विविध कारणे सांगत रक्कम देण्यास टाळाटाळ केली गेली.
तीन वेळा भरलेली एकूण रक्कम दहा लाख रुपयांवर पोहोचली होती. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बॉम्बेला यांनी पोलिसात तक्रार नोंदविली.
यानंतर आता पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे तुम्हालाही जर अशी काही ऑफर आली तर त्याची पडताळणी करूनच व्यवहार करा.