बीड : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाडव्याला (Gudi Padva) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला चौफेर बाजूंनी प्रतिउत्तर येत आहे.
राज ठाकरे यांनी भाषणामध्ये मशीदीच्या (Masjid) भोंग्यांबद्दल उल्लेख केला असून मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा त्यांनी दिला होता.
याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांनी मशीदीच्या बाहेर स्पीकर लावले आहेत, त्यातच आता बीडमध्येही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भोंगा लावून चालीसा लावली आहे, त्यामुळे बीडमध्ये (Beed) तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत हनुमान चालीसा सुरूच राहतील असा पवित्रा मनसेनी घेतला आहे. तसेच राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाने उसळी घेतली आहे.
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टार्गेट करत हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे.
मात्र त्यांच्या भाषणातील अनेक मुद्दे घेऊन महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. परंतु राज ठाकरे यांच्या भाषणाचे भाजप (Bjp) पक्षाकडून चांगलेच कौतुक होत आहे.