Maharashtra news:राज्यातील ९२ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका राज्या निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. मात्र, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय सुटण्याआधीच या निवडणुका होत आहे.
त्यामुळे ओबीसींमध्ये पुन्हा एकदा अस्वस्था आहे. विरोधकांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्वाचे वक्तव्य केले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, हीच आमचीही भूमिका आहे, त्यामुळे त्या पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचे शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले आहे.
पूर्वीच्या आघाडी सरकारवरही अशीच वेळ आली होती. त्यामुळे पावसाचे कारण पुढे करून सरकारने आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्यासा सांगितले होते. मात्र, ज्या भागात पाऊस कमी आहे, अशी भागाची माहिती घेऊन तेथील निवडणुका आयोगाने जाहीर केलेल्या आहेत.
ओबीसी आरक्षणासंबंधी कोर्टाने निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे त्या कारणासाठी आयोगाला निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत. या परिस्थितीत नवे सरकार काय कारण शोधते, काय उपाय करते याकडे लक्ष लागले आहे.