महाराष्ट्र

मानखुर्द-वाशी पुलाचे काम लवकरच होणार पूर्ण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

Maharashtra News : ठाणे खाडी पूल प्रकल्पाचाच भाग असणाऱ्या मानखुर्द ते वाशीदरम्यानच्या तीन लेन पुलाचे काम जूनपर्यंत तर उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

या पुलामुळे सध्याच्या मानखुर्द आणि वाशी प्रवासाला बळकटी मिळणार आहे. या पुलाचे काम ७३ टक्के पूर्ण झाल्याचेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मानखुर्द-वाशी या पुलावर दरदिवशी दोन लाखांहून अधिक वाहनचालक ये-जा करत आहेत. या पुलाला नव्या लेन जोडल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५५९ कोटी रुपये इतका आहे.

आधीच अस्तित्वात असलेल्या या पुलाला सहापदरी अतिरिक्त सहा मार्गिका जोडण्यात येणार आहे. सध्याच्या पुलाला दोन्ही बाजूला तीन लेनचे दोन पूल असणार आहेत. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक दिशेला सहा मार्गिका असणार आहे.

या पुलाचे काम एल अॅण्ड टीच्या माध्यमातून पूर्णत्वास येत असून, ईपीसीअर्थात अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम प्रणाली तत्त्वावर पूर्ण करण्यात येत आहे. पुलावरील वाहतूक मुंबईच्या दिशेने अधिक होत असल्याने पुलाचा मुंबई, नवी मुंबई भाग खुला केल्याने वाहनधारकांना तत्काळ दिलासा मिळणार आहे.

मानखुर्द-वाशीदरम्यानच्या नव्या पुलाचे काम २०१२ पासून सुरू होणे अपेक्षित होते, प्रत्यक्षात मात्र २०२० मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाण्याच्या भरती ओहोटीच्या वेळा, रेल्वे मेगाब्लॉक लक्षात घेता पुलाचे काम पूर्ण करण्यात येत असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts