Maharashtra Rain:कोकण,विदर्भात धुमाकूळ घातलेल्या नंतर पावसाने आता पुणे, नाशिक, नगर पट्ट्याला लक्ष्य केले आहे. येत्या ४८ तासांसाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी यलो अर्लट जारी करण्यात आला असून शेजारील पुणे आणि नाशिकसाठी मात्र रेड अर्लट जारी केला आहे.
त्यामुळे पाऊस आणि पुराचा फटका नगर जिल्ह्यालाही बसण्याचा अंदाज आहे.कालपर्यंत नाशिकमध्ये मुसाळधार पाऊस होता. आज पुण्यात पावसाने दाणादाण उडविली आहे. त्यामुळे दोन दिवस शाळांना सुट्टी देण्याची वेळ आली आहे.
मुसळधार पावसाने पुणेकर हैराण झाले आहेत. कुठं घरात पाणी तर कुठं थेट पोलीस स्टेशनमध्येच पाणि शिरले आहे. विमानतळाचे कामकाज २० मिनिटे ठप्प झाले होते. सुमारे १५ विमानांना अर्ध्या तासाचा विलंब झाला तर दोन उड्डाणे रद्द करावी लागली.
पुण्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. उद्यासाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नगरहून पुण्याला जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी. आज सकाळी पुण्याला गेलेल्यांना पाऊस आणि वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.
तासंतास वाहने अडकून पडली होती.नगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नगरलाही जोरदार पावसाची शक्यता आहे. शिवाय शेजारील जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यास त्याचाही फटका नगरला बसणार आहे.