महाराष्ट्र

बसस्टॅन्डवर गेल्यावर तुम्हाला एका क्लिकवर कळेल की तुमची बस आता कुठे आहे? हे ॲप्लिकेशन करेल तुम्हाला मदत

बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल किंवा अनुभव येतो की आपण जेव्हा एखादया गावाला जायला निघतो व बस स्टैंड वर बसची वाट पाहत उभे असतो. परंतु त्या बसचा जो काही वेळ असतो त्यापेक्षा बस बऱ्याचदा उशिरा येते व आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही व कित्येक वेळा ताटकळत उभे राहावे लागते. तसेच बऱ्याचदा जाताना आपण उशिरा पोहोचतो व आपली बस चुकते व त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

अशा वेळेस जर तुम्हाला बस स्टॅन्डवर गेल्यावर किंवा तुमच्या घरून एका क्लिकवर जर कळाले की तुम्हाला ज्या बसने जायचे आहे ती आता कुठे आहे आणि किती वेळ तिला यायला लागणार आहेत तर किती छान होईल. हो अगदी याच पद्धतीने आता तुम्हाला एका क्लिकवर तुमच्या बसचे लोकेशन ट्रॅक करता येणार आहे  व त्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून एक एप्लीकेशन विकसित करण्यात आलेले आहे.

 एका क्लिकवर कळणार तुमच्या बसचा ठाव ठिकाणा

बऱ्याचदा आपण बस स्टॅन्डवर जातो व गावाकडे जाणारी बस कुठे लागते किंवा आता कुठे आहे? बसला यायला अजून किती वेळ लागणार आहे? इत्यादी बद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे बऱ्याचदा अनेक समस्या निर्माण होतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून तुम्हाला म्हणजेच प्रवाशांना आता एका क्लिकवर ही सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. याकरिता प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने(एमएसआरटीसी) एप्लीकेशन तयार केले असून येत्या नोव्हेंबर पासून ते सेवेत कार्यान्वित करण्यात येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी प्रवास हा प्रवाशांना सोयीचा व्हावा याकरिता शिवसेना भाजप महायुती सरकारच्या काळामध्ये तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी गाड्यांमध्ये व्हीटीएस प्रणाली कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत कोरोना आणि एसटी संप इत्यादींमुळे हा प्रकल्प रखडला गेला होता. मोबाईल मधील प्ले स्टोअरवर एमएसआरटीसी कॅम्पुटर अँप उपलब्ध आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना ते मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये वापरता येणार आहे.

 या एप्लीकेशनच्या माध्यमातून कोणत्या सुविधा मिळतील?

या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तिकिटाचे आरक्षण, बसचे लोकेशन ट्रेकिंग तसेच त्या बसचा मार्ग, महिला सुरक्षितता, एखाद्या मार्गस्थ गाडीमध्ये झालेला बिघाड, वैद्यकीय मदत आणि एखाद्या आणीबाणीच्या वेळी प्रवाशांच्या मदतीसाठी सुविधा देखील यामध्ये देण्यात आलेले आहेत. एवढेच नाही तर एसटी प्रवाशांचे जे काही एसटी सेवेविषयी मत किंवा अभिप्राय असतील ते ऑनलाइन घेण्याची सुविधा देखील या एप्लीकेशनमध्ये आहे.

यामध्ये प्रवाशांना एखाद्या संबंधित विषयाबद्दल तक्रार देण्याकरिता स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांक ऑनलाईन नोंदवावा लागणार आहे. एवढ्यच नाही तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये एसटीचा नियंत्रण कक्ष, पोलीस तसेच ॲम्बुलन्स यांना देखील थेट फोन करण्याची सुविधा देखील या एप्लीकेशन मध्ये असणार आहे. येत्या नोव्हेंबर पासून हे ॲप सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे नक्कीच आता एसटी सेवेमध्ये येणाऱ्या बऱ्याच समस्या या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सोडवू शकणार आहात.

Ajay Patil

Recent Posts