आर्थिक

पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेत 1, 2 आणि 5 लाख रुपये 5 वर्षांकरिता गुंतवले तर मिळेल भरघोस परतावा! कमवायचे पैसे तर जाणून घ्या माहिती

PNB Bank FD Scheme:- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित असा प्रकार समजला जातो व यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा देखील उत्तम मिळत असल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांकडून विविध बँकांच्या एफडी योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जाते.

आपल्याला माहित आहे की प्रत्येक बँकेच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात आणि एफडी करण्याच्या कालावधीनुसार वेगवेगळ्या व्याजदर दिला जातो. गुंतवणूकदार हे त्यांच्या सोयीनुसार कालावधीची निवड करून एफडी करत असतात.

बँकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर पंजाब नॅशनल बँक फिक्स डिपॉझिट स्कीम अंतर्गत गुंतवणूकदारांना एक चांगला पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देत आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या फिक्स डिपॉझिट योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दीर्घ कालावधीसाठी पैसे लॉक न करता देखील आकर्षक व्याजदरांचा फायदा मिळवू शकतात.

तुम्हाला जर एफडी करायची असेल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये एफडी करून चांगला परतावा मिळवू शकतात. विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँकेकडून अलीकडच्या कालावधीत व्याजदर वाढवल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही योजना आणखी फायदेशीर झाली आहे. इतर बँकांप्रमाणेच सामान्य गुंतवणूकदारांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना 0.50% जास्त व्याजाचा लाभ या बँकेच्या माध्यमातून दिला जातो.

पंजाब नॅशनल बँकेचा एफडी कालावधीनुसार व्याजदर
तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेमध्ये एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर तुम्हाला वार्षिक 6.50 टक्के इतका व्याजदर दिला जातो. तसेच तीन वर्षाचा कालावधी करिता एफडी केली तर अंदाजे सात टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदर मिळतो व चार ते पाच वर्षाच्या कालावधी करिता 6.50% इतके व्याज दर दिला जातो.

किती गुंतवणूक केली तर किती परतावा मिळेल?

1- एक लाख रुपयाची गुंतवणूक पाच वर्षाच्या कालावधीत केली तर- समजा तुम्हाला एक लाख रुपयांची एफडी पाच वर्षाच्या कालावधी करिता करायची असेल तर तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेच्या माध्यमातून 6.50% इतक्या दराने व्याज दिले जाईल. त्यानुसार तुम्हाला एक लाखावर जवळपास 38 हजार 42 रुपये इतके व्याज मिळेल व तुमचे मुद्दल आणि व्याज मिळून तुम्हाला पाच वर्षात एक लाख 38 हजार 42 रुपये मिळतील.

2- दोन लाख रुपये पाच वर्षांकरिता गुंतवले तर- समजा तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या या एफडी योजनेमध्ये दोन लाख रुपयांची एफडी पाच वर्षाच्या कालावधी करिता केली तर तुम्हाला पाच वर्षात दोन लाखावर 76084 रुपये व्याज मिळेल व तुमचे मुद्दल आणि व्याज मिळून तुम्हाला पाच वर्षात दोन लाख 76 हजार 84 रुपये इतका परतावा मिळेल.

3- पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर- समजा तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या या एफडी योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक पाच वर्षांच्या कालावधी करिता केली तर तुम्हाला 6.50% वार्षिक दराने व्याज मिळेल व हे व्याज एक लाख 90 हजार दोनशे दहा रुपये असेल. अशाप्रकारे तुमची मुद्दल आणि व्याज मिळून तुम्हाला पाच वर्षात सहा लाख 90 हजार दोनशे दहा रुपये मिळतील.

काय आहेत पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये?
या योजनेसाठी तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या मोबाईल ॲप वरून ऑनलाईन देखील अर्ज करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा 0.50% अधिक दराने व्याज मिळते.तसेच मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देखील तुम्हाला उपलब्ध आहे.

परंतु यामध्ये बँकेच्या काही अटी आणि शुल्क तुम्हाला लागू होऊ शकते. पंजाब नॅशनल बँकेच्या या योजनेत तुम्ही कमीत कमी 1000 रुपयाची गुंतवणूक करू शकतात व जास्तीची रक्कम तुमच्या बजेटनुसार तुम्ही जमा करू शकतात. तसेच ही योजना पाच वर्षाच्या लॉक इन कालावधीसह कर बचत एफडी म्हणून देखील उपलब्ध आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts