3 Business Idea : आजच्या काळात अनेकजण नोकरी न करता व्यवसायाकडे वळत आहेत. तसेच अनेकजण सध्या छोटे मोठे व्यवसाय करताना दिसत आहेत. व्यवसायामध्ये अधिक नफा कमवून कमी वेळेत श्रीमंत देखील झालेली अनेक उदाहरणे समाजात आहेत.
तुम्हीही व्यवसाय करू इच्छित आहेत आणि तुम्हाला व्यवसायाबद्दल जास्त माहिती नसेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही असे अनेक व्यवसाय आहेत जे करून कमी वेळेत लाखोंचा नफा कमवू शकता.
व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे भांडवल असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही व्यवसाय सुरु करू शकता. आज तुम्हाला अशा 3 व्यवसायांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला येत्या काळात चांगला नफा कमवून देऊ शकतात.
भविष्यात नफा देणारे 3 व्यवसाय
1. ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करा
सध्या देशामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला अधिक गती आल्याचे दिसत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र देशामध्ये काही मोजक्याच ठिकाणी इलेक्ट्रिक स्टेशन्स उपलब्ध आहेत.
देशात हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढणार आहे. हेच लक्षात घेता तुम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करू शकता. अशी चार्जिंग सेटशां तुम्ही सध्या शहरांमध्ये सुरु करू शकता. कारण सध्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.
2. बायो सीएनजी व्यवसाय
बायो CNG बिझनेस म्हणजे काय?
जर तुम्हीही व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी बायो CNG व्यवसाय सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय टाकाऊ वस्तू म्हणजेच शेतीचा कचरा, अन्न, कचरा अशा वस्तूंपासून सुरु केला जाऊ शकतो.
अशा वस्तू टाकीमध्ये टाकून जीन प्रक्रिया, नंतर ब्रेकडाउन नंतर ते बायो गॅस बनते आणि बायो गॅस शुद्ध करून बायो सीएनजी बनविला जातो. या सीएनजी गॅसचा तुम्ही वापर तुमच्या सीएनजी कारसाठी देखील करू शकता.
तुम्ही हा व्यवसाय सुरु करून चांगला नफा कमवू शकता. तुम्ही तयार केलेला बायो गॅस डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरसारख्या महागड्या गॅसला पर्याय आहे. हा व्यवसाय भारतामध्ये झपाट्याने वाढत आहे.
भारतात दरवर्षी ६२ दशलक्ष टन कचरा निर्माण होत आहे ज्याचा वापर आपण बायो सीएनजी बनवण्यासाठी करू शकतो. म्हणूनच भारत सरकारने सॅट योजनाही आणली होती. म्हणजे परवडणाऱ्या वाहतुकीच्या दिशेने शाश्वत पर्यायी, ज्यामध्ये 2023 पर्यंत 15 दशलक्ष टन बायो सीएनजी गॅसचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
3. आयात निर्यात व्यवसाय
तुम्ही आयात निर्यातीचा व्यवसाय सुरु करून देखील चांगला नफा कमवू शकता. आपल्या देशातून इतर देशात उत्पादने पाठवणे आणि त्या देशातून आपल्या देशात उत्पादने आणणे हा देखील खूप मोठा व्यवसाय आहे.
अनेकजण आता हा व्यवसाय करू लागले आहेत. तसेच अनेकजण हा व्यवसाय करण्यासाठी घाबरत असतात. कारण व्यापार नोंदणी, चलनातील चढउतार, लॉजिस्टिक, सांस्कृतिक फरक या कारणांमुळे लोक आयात निर्यातीचा व्यवसाय करत नाहीत.
तुम्ही तुमची काही उत्पादने तयार करून ती इतर देशातील किंवा आपल्या देशातील मार्केटमध्ये पोहोचवू शकता. सध्या आयात आणि निर्यातीचा व्यवसाय करणे अनेकजण चांगला नफा कमावत आहेत. तसेच येत्या काळात या व्यवसायाला चांगलंही मागणी देखील येण्याची शक्यता आहे.