Post Office : पोस्ट ऑफिसकडून अनेक सरकारी योजना ऑफर केल्या जातात, ज्यामध्ये गुंतवणूक करून लोकांना काही काळानंतर चांगला नफा मिळतो आहे. शेअर बाजार किंवा इतर ठिकाणांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस योजनांमध्ये धोका नगण्य आहे. म्हणजेच येथे पैसे गमावण्याची धोका शून्य आहे. अशातच जर तुम्हालाही कोणतीही जोखीम न घेता जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे दुप्पट होतील.
पोस्ट ऑफिसची ही लोकप्रिय योजना किसान विकास पत्र (KVP) आहे. विशेषत: अधिक नफा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यांत दुप्पट होतात. या योजनेत, तुम्ही 100 च्या पटीत किमान 1000 रुपये गुंतवू शकता. विशेष म्हणजे यामध्ये कमाल मर्यादा नाही. तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही गुंतवू शकता.
तुम्ही किती खाती उघडू शकता?
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकल आणि दुहेरी दोन्ही खाती उघडता येतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. तसेच, एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यालाही मर्यादा नाही. 2, 4, 6 तुम्ही किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्हाला हवी तेवढी खाती उघडू शकता.
व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, व्याज तिमाही आधारावर ठरवले जाते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याज वार्षिक आधारावर जारी केले जात आहे.
जर कोणी या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच 115 महिने या योजनेत राहिल्यास, त्याला केवळ 7.5 टक्के व्याजाच्या आधारे 5 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीवर 10 लाख रुपये मिळतील.