आर्थिक

SIP Investment : फक्त 5,000 रुपयांच्या एसआयपीतून मिळतील 51 लाख, कसे? जाणून घ्या गणित

SIP Calculation : आजकाल सर्वजण आर्थिक नियोजन करू लागले आहेत. तुम्हीही योग्य वयात आर्थिक नियोजन सुरू केले, तर तुम्ही 40 वर्षांचे होईपर्यंत तुमच्याकडे चांगला निधी जमा होईल, जो तुम्हाला तुमचे पुढचे आयुष्य अगदी आरामात जगण्यास मदत करेल.

तुमच्या माहितीसाठी, म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना हा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही अधिकाधिक पैसे जमा करू शकता आणि तुमचे भविष्य चांगले बनवू शकता.

जर तुम्ही दरमहा फक्त 5,000 रुपये गुंतवले तर तुम्ही अंदाजे 55 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. मात्र यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे वार्षिक 5 ते 10 टक्के वाढवावे लागतील. चला त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

जर तुम्ही फक्त 5000 चा SIP प्लॅन सुरू केला आणि त्यात दरवर्षी 5 टक्केने वाढ केली तर तुम्हाला खूप मोठे फायदे मिळतील. समजा तुम्ही 5,000 रुपयांची एसआयपी सुरू केली.

आणि जर तुम्ही दरवर्षी 5 टक्के रक्कम वाढवत राहिल्यास, तुमची रक्कम देखील वर्षानुवर्षे वाढत जाईल. मात्र, पहिल्या वर्षी तुम्हाला फक्त 50,000 रुपये जमा करावे लागतील. पण नंतर ही मोठी रक्कम बनत जाईल.

जर तुम्ही 5 हजार रुपयांची एसआयपी घेतली तर तुम्हाला एका वर्षात फक्त 60 हजार रुपये गुंतवावे लागतील आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला 5 हजार रुपयांसह फक्त 250 रुपये मासिक गुंतवावे लागतील. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला एसआयपीमध्ये 5250 रुपये जमा करावे लागतील.

या प्रकरणात, तुम्ही दुसऱ्या वर्षी 1.23 लाख रुपये जमा कराल. त्याचप्रमाणे, जर दरवर्षी तुमचे पैसे 5 टक्के वाढ सुरु ठेवली आणि 18 वर्षे या पद्धतीने नियमितपणे गुंतवणूक करत राहिलात तर तुमच्याकडे एकूण रक्कम 16.87 लाख रुपये होईल.

आता तुमच्या SIP वर अंदाजे 12 टक्के दीर्घ मुदतीचा परतावा गृहीत धरल्यास, 12 टक्के दराने तुम्हाला फक्त व्याजातून 34.50 लाख रुपये मिळतील, म्हणजेच 18 वर्षांनंतर तुम्हाला 51.45 लाख रुपये मिळतील.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts