7th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर पाहिले तर त्यांना मिळणारा महागाई भत्ता, घर भाडेभत्ता आणि सातवा वेतन आयोग आणि आठव्या वेतन आयोगाची स्थापना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण या सगळ्या बाबींचा एकंदरीत परिणाम हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो.
त्यामुळे याविषयीच्या अनेक प्रकारच्या मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या असतात. म्हणून त्या अनुषंगाने जर पाहिले तर देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी मोठी भेट मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जर आपण मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्यानुसार मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% इतका महागाई भत्ता मिळत असून यामध्ये जर चार टक्क्यांची वाढ झाली तर एकूण महागाई भत्ता हा 50 टक्के होईल. महागाई भत्त्यातील वाढ ही सातव्या वेतन आयोगाच्या करारानुसार होत असते
व त्यानुसारच मागच्या वेळी सरकारने ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली होती. त्याचप्रमाणे यावर्षी देखील महागाई भत्तात चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु अजूनपर्यंत मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून याबाबतीत कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही.
महागाई भत्त्यासोबत वाढणार घरभाडे भत्ता
जेव्हा सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात परत चार टक्क्यांची वाढ केली जाईल.तेव्हा एकूण महागाई भत्ता हा 50 टक्के होईल व यानंतर जर नियमानुसार पाहिले तर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घर भाडेभत्त्यात देखील वाढ होईल.
कारण सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता जेव्हा 50 टक्क्यांपेक्षा जास्त होतो तेव्हा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करावी लागते. जर मीडिया रिपोर्टचा विचार केला तर महागाई भत्ता 50% पेक्षा जास्त होईल तेव्हा घर भाडेभत्ता देखील 30% पर्यंत वाढवता येऊ शकतो.
किती होईल कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये वाढ?
केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात चार टक्क्यांची वाढ केली तर त्याचा परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीवर दिसून येणार आहे. समजा कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल व त्याला 46 टक्के दराने सध्या महागाई भत्ता मिळत असून तो आकडेवारीनुसार 8280 रुपये होईल.
परंतु जर यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली म्हणजेच जर महागाई भत्ता 50% झाला तर त्यानंतर पगारातील महागाई भत्ता हा 9000 रुपये होईल. म्हणजे महागाई भत्त्यात 720 रुपयांनी वाढ होणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56 हजार 900 रुपये आहे त्यांना सध्याच्या दराने 26,174 रुपये इतका महागाई भत्ता मिळत आहे.
जेव्हा महागाई भत्ता 50% होईल तेव्हा महागाई भत्ता हा त्यानुसार 28 हजार 450 रुपये होईल. म्हणजेच आकडेवारी पाहिली तर महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर दरमहा कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये साधारणपणे 2276 रुपयांनी वाढ होणार आहे.