आर्थिक

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल महिन्यात डीएमध्ये ३१ टक्के वाढ होणार

7th Pay Commission : मध्य प्रदेश सरकारने (Government of Madhya Pradesh) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA) वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच पगारातही (Salary) लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना ३१ टक्के डीए मिळणार आहे. व एप्रिल महिन्यापासून पगारही वाढणार आहे.

सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना २० टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. एप्रिल (April) महिन्यापासून ही वाढ लागू होणार आहे. मध्य प्रदेश सरकारच्या या घोषणेचा राज्यातील सुमारे ७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

डीए वाढवण्याची घोषणा करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) म्हणाले की, आम्ही कोरोनाच्या (Corona) काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवू शकलो नाही. आता आम्ही ती वाढवून ३१ टक्के करणार असून एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळू लागेल. सरकारच्या या निर्णयाचा लाभ सुमारे ७ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

एका माहितीनुसार, डीए वाढवल्यानंतर मध्य प्रदेशातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मासिक पगार २०००० हजारांवरून २५००० रुपयांपर्यंत वाढू शकतो. यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते. असे मानले जात आहे की पुढील कॅबिनेट बैठकीत (cabinet meeting) मोदी सरकार (Modi government) डीए वाढवण्याची घोषणा करू शकते.

मोदी सरकार महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ५० लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts