7th Pay Commission : भारत सरकार (Government of India) केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (central employees) पुन्हा तोंड गोड करणार असून कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये (salary) वाढ होण्याची घोषणा (Announcement) होऊ शकते.
केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल. सरकारने यापूर्वी २०१७ मध्ये एंट्री लेव्हलचे मूळ वेतन 7,000 रुपये प्रति महिना वरून 18,000 रुपये केले होते.
फिटमेंट फॅक्टर वाढेल
जर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पगारात वाढ होईल. सध्या कर्मचार्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळतो, तो 3.68 टक्के केला तर कर्मचार्यांचे किमान वेतन 8,000 रुपयांनी वाढेल.
याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे.
पगार खूप वाढेल
फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल. आत्ता जर तुमचा किमान पगार 18,000 रुपये असेल, तर भत्ते वगळून, तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये असेल (26000X3.68 = 95,680).
पूर्वी हा मूळ पगार होता
केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या. प्रवेश स्तरावरील मूळ वेतन दरमहा 7,000 रुपये वरून 18,000 रुपये करण्यात आले, तर सर्वोच्च स्तर म्हणजेच सचिवाचे वेतन 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आले. वर्ग 1 अधिकार्यांसाठी, सुरुवातीचे वेतन 56,100 रुपये होते.