आर्थिक

7th Pay Commission : पगारात होणार बंपर वाढ! सरकार ‘या’ दिवशी वाढवणार महागाई भत्ता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारकडून मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करू शकते. त्यामुळे याचा मोठा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.

हे लक्षात घ्या की केंद्र सरकारकडून मार्च 2023 मध्ये महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आली होती. सरकारने DA मध्ये ४ टक्के वाढ केल्याने कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचला आहे.

1.17 कोटींपेक्षा जास्त केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक जुलै महिन्यात महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा DA आणि DR वर्षातून दोनवेळा वाढकरण्यात येते. जानेवारीसाठी महागाई भत्ता वाढ मार्च 2023 मध्ये जाहीर केली होती.

डीएमध्ये 4 टक्क्यांची वाढ

सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 टक्के दराने DA आणि DR देण्यात येत आहे. मागील वेळी मार्चमध्ये 38 पैकी 4 टक्के वाढ करण्यात आली होती. आता जुलैमध्ये प्रस्तावित वाढीमध्येही सरकार डीए, डीआरमध्ये कमीत कमी ४ टक्क्यांची वाढ करू शकेल, अशी आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे. आता सरकार 30 जून किंवा 1 जुलै रोजी याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

किती वाढणार पगार?

समजा एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 23,500 रुपये प्रति महिना असल्यास 42 टक्के DA नुसार प्रत्येक महिन्याला एकूण महागाई भत्ता 9,870 रुपये आहे. आता सरकारकडून प्रस्तावित डीए वाढीमध्ये 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्क्यांपर्यंत वाढ केल्यास रक्कम 10,810 रुपये होऊ शकते. अशाप्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला 940 रुपये अधिक पगार मिळू शकेल. .

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts