7th Pay Commission News : सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक गुड न्युज आलेली आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरात सरकारी कामगार असेल तर बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची आहे. कारण सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलैमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र आता याबाबत सांगता येणार नाही. कारण अद्यापपर्यंत डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
तसे पाहिले तर चालू आर्थिक वर्षात सरकार पहिल्यांदाच डीए वाढवणार आहे. AICPI च्या एप्रिलच्या आकडेवारीनुसार विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात 3 ते 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
तथापि, ते मे आणि जूनच्या आकडेवारीवर देखील अवलंबून असेल. AICPI चे मे आणि जूनचे आकडे चांगले असल्यास 4 टक्के महागाई भत्ता वाढू शकतो. अशी शक्यता आहे.
DA किती वाढणार?
सध्या जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर नजर टाकली तर आत्ता 42 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे . मात्र जर सरकारने निर्णय घेऊन डीएमध्ये आणखी 4 टक्क्यांनी वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के होईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एप्रिलसाठी AICPI आकडा 134.2 स्कोअर आहे आणि DA स्कोअर 45.06 आहे. हाच आकडा मे आणि जूनमध्ये निर्देशांक 46.40 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचा अर्थ डीएमध्ये 4 टक्के वाढ जवळपास निश्चित आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार?
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार 18 हजार रुपये असेल तर 42% DA नुसार महागाई भत्ता 7560 रुपये होईल. दुसरीकडे, जर आपण 46 टक्क्यांनुसार डीए मोजले तर ते 8280 रुपये असेल, म्हणजे दरमहा पगारात 720 रुपये आणि वार्षिक 99,360 रुपयांची वाढ होईल.
मूळ पगारही वाढण्याची शक्यता
जुलैमध्ये, डीए वाढीशिवाय, कर्मचार्यांना मूळ पगारात वाढीची भेट देखील मिळू शकते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 8,000 रुपयांची वाढ अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे किमान वेतन 18,000 रुपये असेल तर ते 26,000 रुपये होईल. मात्र जेव्हा सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवेल तेव्हा हे सर्व शक्य आहे.