आर्थिक

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची नवीन वर्षाची सुरुवात होईल आनंदात! महागाई भत्यासोबत मिळणार ‘या’ भत्त्याची भेट

7th Pay Commission:- नवीन वर्षाची सुरुवात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार असल्याची सध्या चर्चा आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात येणाऱ्या नवीन वर्षामध्ये चार ते पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात येत आहे.

जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर मागील काही दिवसा अगोदर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली व अगोदर मिळणारा बेचाळीस टक्के महागाई भत्ता हा या चार टक्के वाढीसह 46 टक्के इतका झालेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत ही वाढ करण्यात आलेली आहे.

परंतु जर आपण काही मीडिया रिपोर्टनुसार पाहिले तर जानेवारी ते जून या सहामाहीसाठी महागाई भत्ता चार ते पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते. जर ही चार ते पाच टक्क्यांची वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% पर्यंत वाढेल अशी शक्यता आहे.

पाच टक्क्यांची वाढ झाली तर तो या वाढीसह 50 टक्क्यांच्या पुढे म्हणजे 51% च्या पुढे जाऊ शकतो. याचा अनुषंगाने जर महागाई भत्त्यात वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा एचआरए म्हणजेच घर भाडे भत्ता देखील वाढतो. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीसोबत घर भाडे भत्तावाढ देखील मिळण्याची शक्यता आहे.

 महागाई भत्त्यात वाढ झाल्यास घरभाडे  भत्ता देखील वाढेल

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक होताच घर भाडेभत्त्यात देखील सुधारणा केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सातव्या वेतन आयोगाची शिफारशीनुसार विचार केला तर महागाई भत्ता 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा केली जाईल. घर भाडे भत्ता वाढीकरिता शहरांची एक्स, वाय आणि झेड अशा तीन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आलेले आहे.

 शहरांच्या श्रेणीनुसार किती वाढेल घरभाडे भत्ता

सध्या जर आपण पाहिले तर एक्स श्रेणी असलेल्या शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 27%, वाय श्रेणी शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 आणि झेड श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ टक्के घर भाडे भत्ता मिळत आहे. परंतु जर घर भाडेभत्त्यात वाढ झाली तर एक श्रेणीच्या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढेल

व वाय श्रेणीसाठी 20% आणि झेड श्रेणीसाठी दहा टक्के इतकी घर भाडे भत्त्यात  वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर महागाई भत्ता वाढीसह या नवीन वर्षात घर भाडे भत्ता वाढणार असल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

 कधी होऊ शकते यासंबंधीची घोषणा?

जर आपण अशा वाढी संदर्भातला आतापर्यंतचा पॅटर्न बघितला तर मार्च महिन्यात सरकार महागाई भत्तावाढीची घोषणा करत असते व ही वाढ जानेवारी ते जून पर्यंत लागू असते. त्यानंतर जुलै ते डिसेंबर या कालावधीतील भत्त्यात ऑक्टोबर महिन्यात वाढ जाहीर केली जाते. अशाप्रकारे वर्षातून सहामाही तत्त्वावर दोन वेळा वाढीव भत्ते कर्मचाऱ्यांना मिळत असतात. त्यामुळे आता जानेवारीत यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts