7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून केंद्र सरकारचे कर्मचारी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये वाढ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या महिन्यात महागाई भत्त्यात वाढ आणि महागाई सवलतीची मोठी भेट मिळेल. याचा फायदा लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना ४२ टक्क्यांनी महागाई भत्ता मिळत आहे. आता त्यात वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. समजा जर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वार्षिक 8,000 ते 27,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल.
रिपोर्टनुसार, केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली जाईल. या महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये वाढ करण्यास ग्रीन सिग्नल देईल, असे सांगितले जात आहे. कामगार मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या AICPI निर्देशांकात, जून 2023 पर्यंत 46.24 टक्के महागाई भत्ता देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार ते 46 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकार फक्त AICPI निर्देशांक डेटाच्या आधारावर महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याची घोषणा करते. अशा परिस्थितीत जर केंद्र सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला तर तो ४२ वरून ४६ टक्के होईल आणि याचा फायदा १ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. परंतु अजूनही याबाबत अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही.
सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना १ जानेवारी २०२३ पासून ४२ टक्के दराने महागाई भत्ता आणि महागाई सवलत दिला जात आहे. १ जुलै 2023 पासून महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू मानली जाईल. जर महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वार्षिक 8,000 ते 27,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.