केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जातात. त्यांना नियमित वेतना सोबतच महागाई भत्ता आणि घर भाडे पत्ता देखील दिला जातो. सध्या जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर तो सध्या 42 टक्के आहे. त्यासोबतच जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता असून त्यामध्ये चार टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. हे वाढ झाल्यानंतर महागाई भत्ता हा 46% होईल. महागाई भत्त्यासोबतच घर भाडे भत्ताबाबत देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार करू शकते एचआरए मध्ये वाढ
काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्यानुसार केंद्र सरकार लवकरच एचआरए म्हणजेच घर भाडे भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. जर आपण घर भाडे भत्त्याचा विचार केला तर 2021 मध्ये तो सुधारित करण्यात आला होता. घर भाडे भत्ता अर्थात एच आर ए मध्ये वाढ झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये देखील वाढ होणार आहे. घर भाडे भत्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कर्मचारी ज्या शहरांमध्ये राहतात त्या शहराच्या आधारावर कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता मिळत असतो. जे कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात त्यांच्या करिता हा भत्ता दिला जातो. घर भाडे भत्त्याचे साधारणपणे तीन श्रेणीमध्ये विभागणी केली जाते.
घर भाडे भत्ता ठरवण्यात या तीन श्रेणी आहेत महत्त्वाच्या
1-X श्रेणी– या श्रेणीमध्ये प्रामुख्याने 50 लाख आणि त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेले शहर येतात. अशा शहरांच्या किंवा अशा ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत सीपीसी अर्थात केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 24% घर भाडे भत्ता दिला जातो.
2-Y श्रेणी– या श्रेणीमध्ये पाच लाख ते 50 लाख लोकसंख्या असणारे क्षेत्र येते. अशा शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या 16 टक्के घरभाडे भत्ता अर्थात एच आर ए दिला जातो.
3-Z श्रेणी– ज्या क्षेत्राची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा कमी आहे. असे कर्मचारी झेड या श्रेणीत येतात. कर्मचाऱ्यांना आठ टक्के घरभाडे भत्ता दिला जातो.