7th Pay Commission Update : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर त्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे.
केंद्र सरकारकडून २०२३ या नवीन वर्षांमध्ये मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा लाखो केमदर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना झाला आहे.
केंद्र सरकारकडून मार्च महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आई आहे. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के झाला आहे. मागील DA वाढ करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्के होता.
कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये वाढ करण्यात येत असते. दरवर्षी दर ६ महिन्यांनी वाढ करण्यात येत असते. मात्र यावर्षी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये मार्च महिन्यामध्ये वाढ करण्यात आली. पण कर्मचाऱ्यांना या DA वाढीचा फायदा जानेवारी २०२३ पासूनच देण्यात येणार आहे.
मात्र आता कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ लवकरच केंद्र सरकारकडून जाहीर केली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या महागाई भत्त्यात देखील ४ टक्के वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के वाढू शकतो. तसेच ही DA वाढ १ जुलै पासून लागू केला जाऊ शकतो.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दुर्गापूजा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर DA वाढीची मोठी भेट दिली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
AICPI निर्देशांक
एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढला जाऊ शकतो. आतापर्यंत जाहीर झालेल्या निर्देशांकात तो जानेवारीत १३२.८ अंकांवर होता. जे फेब्रुवारी महिन्यात 0.1 अंकांनी कमी होऊन 132.7 अंकांवर आले. त्याच वेळी, मार्च महिन्यात हा आकडा 0.6 अंकांनी वाढून 133.3 अंकांवर पोहोचला, तर एप्रिलमध्ये तो 0.9 टक्क्यांनी वाढून 134.2 वर पोहोचला.
कर्मचाऱ्यांना पगारात होणार वाढ
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. 7 व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कॅबिनेट सचिव स्तरावर 56,900 रुपये आहे. 46 टक्के, 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक डीए वाढ 8,640 रुपये होईल.
म्हणजेच 720 रुपये दरमहा महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. 56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनाच्या ब्रॅकेटमध्ये एकूण 27,312 रुपयांच्या वार्षिक महागाई भत्त्यात वाढ मिळेल.
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार
केंद्र सरकारकडून जर महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली तर त्याचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे. सप्टेंबर किंवा त्यापुढील महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होऊ शकतो.