आर्थिक

7th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांवर पडणार पैशांचा पाऊस! लवकरच मिळणार एक नाही तर ३ भेटवस्तू, जाणून घ्या सविस्तर

7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून लवकरच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली जाऊ शकते. मात्र आता कर्मचाऱ्यांना १ नाही तर ३ आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार आहे. तसेच त्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ लवकरच केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी लवकरच मालामाल होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे.

देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये आनंदाची बातमी मिळू शकते. केंद्र सरकारकडून या महिन्यामध्ये एका पाठोपाठ तीन भेटवस्तू मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्मचारी संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार डीएमध्ये वाढ, डीएची थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टरवर मोठा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या २०२३ मधील पहिला महागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला आहे. तसेच हा महागाई भत्ता जानेवारी २०२३ मध्येच वाढणे अपेक्षित होते. मात्र महागाई भत्ता उशिरा वाढवण्यात आला पण कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ पासूनच महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ जुलै महिन्यामध्ये होणे अपेक्षित होते मात्र या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचे दिसत आहे. मात्र कर्मचाऱ्यांना ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये DA वाढ मिळू शकते.

ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शन धारकांवर पैशांचा पाऊस केला जाऊ शकतो. केंद्र सरकारकडून एकाच वेळी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ, तसेच थकीत DA आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ याबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात.

मार्च २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांचा पाहायला महागाई भत्ता वाढ ४ टक्क्यांनी करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के होता मात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के झाल्याने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के झाला आहे.

केंद्र सरकारकडून लवकरच कमर्चाऱ्यांच्या दुसऱ्या महागाई भत्त्यात देखील ४ टक्के वाढ केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच ४६ टक्के होऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर त्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे.

केंद्र सरकरकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येत असते. पहिली DA वाढ जानेवारी महिन्यात करण्यात येते. तर दुसरी DA वाढ जुलै महिन्यात करण्यात येते.

दर सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते मात्र यावेळी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढ करण्यास विलंब झाला असला तरी कर्मचाऱ्यांना थकीत DA देखील दिला जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts