OnePlus India : सध्या वनप्लसच्या लेटेस्ट फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर सध्या डिस्काउंट सुरु असून, नुकताच लॉन्च झालेला फोन OnePlus 12 कमी किंमतीत विकला जात आहे, जर तुम्ही आता मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही डील तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
वनप्लसचा हा फोन दोन महिन्यांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला होता आणि आता या स्मार्टफोनवर जबरदस्त डील्स उपलब्ध आहेत. या फोनचा टॉप व्हेरिएंट 64,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, तर टॉप एंड व्हेरिएंट 69,999 रुपयांना लॉन्च केला होता. आता पहिल्यांदाच हा फोन कमी किमतीत लिस्ट करण्यात आला असून स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
OnePlus 12 फ्लिपकार्टवर डिस्काउंट आणि अनेक चांगल्या बँक ऑफर्ससह सूचीबद्ध आहे. हा फोन 64,066 रुपयांना लिस्ट झाला आहे. Citi Bank क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची झटपट सूट मिळवण्याची संधी आहे, जी EMI वर उपलब्ध असेल. याशिवाय HSBC क्रेडिट कार्डवर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 12 मध्ये 6.82-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्यामध्ये ProXDR डिस्प्ले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश दरांसह येतो. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस स्क्रीन संरक्षणासह येतो.
तसेचOnePlus 12 मध्ये एक आकर्षक डिझाइन आहे आणि त्यावर चांगली पकड देखील उपलब्ध आहे. फोन दोन रंग पर्यायात येतो. तसेच हा फोन Android 14 आधारित OxygenOS वर काम करतो.
OnePlus 12 मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. त्यापैकी एक 8GB रॅम, 256GB स्टोरेज आणि दुसरा 16GB Ram, 512GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. तसेच फोनची बॅटरी 5,400mAh आहे. जे चार्ज करण्यासाठी, तुम्हाला 100W SUPERVOOC चार्जर आणि 50W AIRVOOC फास्ट चार्जर मिळेल.