आर्थिक

Aadhaar-PAN Linking : नागरिकांनो याच महिन्यात पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे, नाहीतर तुम्हालाही बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Aadhaar-PAN Linking : प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आधारकार्ड खूप महत्त्वाचे आहे. तसेच त्यांच्यासाठी पॅन कार्ड देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे आधारकार्ड आणि पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला आर्थिक कामात अडथळा येऊ शकतो.

इतकेच नाही तर तुम्हाला ही कागदपत्रे इतर कामात देखील खूप गरजेची असतात. परंतु जर तुम्ही अजूनही आधारकार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ते आजच करून घ्या. कारण तुमच्याकडे 30 जूनपर्यंत मुदत आहे. तसेच तुम्हाला यासोबत इतर कामेही करावी लागणार आहेत.

अंतिम मुदतीची वाट नका पाहू

तुम्हाला आधार कार्डशी संबंधित तुमचे काम निकाली काढावी लागणार आहे. तसेच आधार पॅन लिंक करणे आणि आगाऊ कर भरणे यांसारखी कामे आहेत, जी तुम्ही केली नाही तर तुमच्या खिशावर परिणाम होईल. तसेच, जास्त पेन्शन निवडण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अंतिम तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली आहे आणि आता पुढे जाण्याची शक्यता खूप कमी आहे. समजा तुम्ही यापैकी कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण केले नाही, तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता ते आजच पूर्ण करा.

आधार कार्ड -पॅन कार्ड लिंक

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 ही आहे. हे काम आयकर विभागाकडून अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या पॅनकार्डचा काही उपयोग होणार नाही. इतकेच नाही तर अवैध पॅनकार्ड कोणत्याही कारणासाठी वापरले तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंडही भरावा लागण्याची शक्यता आहे.

करावे लागणार आधार अपडेट

नुकतेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून आपल्या वापरकर्त्यांना आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याचा लाभ घेण्याची अंतिम तारीख 14 जून ही आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचे अजूनही आधार कार्ड आतापर्यंत अपडेट केले नसेल, तर तुमच्यासाठी अजूनही संधी आहे, तुम्ही My Aadhaar Portal वर जाऊन हे काम मोफत करू शकता. परंतु आधार केंद्रावर जाऊन माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे.

उच्च पेन्शन पर्याय

यासोबत तुम्हाला ईपीएफ सदस्यांशी संबंधित अतिशय महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. खरं तर, उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी EPFO ​​ने 26 जून 2023 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या की यापूर्वी हे काम करण्यासाठी ३ मे ही तारीख निश्चित केली होती, ती पुढे वाढवली.

आगाऊ कर भरणा

समजा तुमचे कर दायित्व 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुमच्यासाठी जून महिना खूप महत्त्वाचा आहे. कारण अशा लोकांसाठी, तुमच्यासाठी अॅडव्हान्स टॅक्स भरणे आवश्यक आहे. समजा एखाद्याने असे करून चूक केली, तर त्याला पहिल्या तीन हप्त्यांवर 3% आणि आगाऊ कराच्या एकूण रकमेवर शेवटच्या हप्त्यावर 1% दराने व्याज द्यावे लागणार आहे.हा दंड आयकर कलम 23B आणि 24C अंतर्गत आकारला जातो. आगाऊ कर भरणा 4 हप्त्यांमध्ये करावयाचा आहे, ज्याचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 ही असणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts