Banking Updates : आज प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. तसेच बँक खाते सुरु ठेवण्याचे काही नियम देखील आहेत. नियमांनुसार काही सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये, ग्राहकांना दरमहा त्यांच्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे.
लक्षात घ्या खात्यांमधील किमान शिल्लक मर्यादा सर्व बँकांमध्ये वेगवगेळी असते. महानगरे, शहरे आणि ग्रामीण भागातील बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याबाबत काही अटी आहेत. या अटींचे पालन न केल्यास बँक ग्राहकांकडून काही शुल्क आकारते. याशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी देखील काही नियम आहेत.
देशातील सर्वात मोठी PCAU बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मार्च 2020 मध्ये आपल्या बचत खात्यांमध्ये दरमहा किमान रक्कम ठेवण्याची अट रद्द केली होती. यापूर्वी, SBI खातेधारकांना त्यांच्या खात्यातील स्थानानुसार 3000 रुपये, 2000 रुपये आणि 1000 रुपये मासिक सरासरी शिल्लक राखणे आवश्यक होते.
त्याच वेळी, अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीमध्ये, शहरी आणि मेट्रो शहरांमधील बचत खातेधारकांसाठी 10,000 रुपये मासिक शिल्लक राखणे अनिवार्य आहे. तर छोट्या शहरांमध्ये ही रक्कम 5,000 रुपये आहे. त्याच वेळी, ग्रामीण भागातील बँक ग्राहकांना प्रत्येक तिमाहीत सरासरी 2,500 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. हा नियम न पाळल्याबद्दल बँक ग्राहकांकडून दंड आकारते.
मेट्रो किंवा शहरी भागातील ICICI बँक बचत खातेधारकांना किमान मासिक सरासरी शिल्लक 10,000 रुपये, लहान-शहर भागात 5,000 रुपये आणि ग्रामीण भागात 2,000 रुपये ठेवावे लागतील. जे ग्राहक सरासरी शिल्लक राखण्यात अयशस्वी ठरतात, बँक अशा ग्राहकांडून 500 रुपये इतके दंड आकारते.
मेट्रो आणि शहरी भागात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या बचत खातेधारकांना तिमाही आधारावर 20,000 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. त्याच वेळी, लहान शहरे आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना अनुक्रमे 1000 रुपये आणि 500 रुपये किमान तिमाही सरासरी शिल्लक राखणे आवश्यक आहे.
कोटक महिंद्रा बँकेच्या बचत खातेधारकांना मेट्रोमध्ये 10,000 रुपये आणि नॉन-मेट्रो भागात 5,000 रुपये मासिक सरासरी शिल्लक राखणे बंधनकारक आहे. तथापि, किमान शिल्लक राखण्यात अयशस्वी झाल्यास, बँक 6 टक्के कमतरता दंड म्हणून आकारते.