आर्थिक

तुम्हाला माहित आहे का जगातील प्रसिद्ध ब्रॅण्डेड कपडे कोणत्या देशात तयार होतात? 1 हजार रुपये किमतीचे कपडे तयार होतात 100 रुपयात

कपडे ही मानवाचे मूलभूत गरज असून कपड्यांच्या बाजारपेठेचा विचार केला तर जगाच्या पाठीवर अनेक नामांकित असे ब्रँड खूप प्रसिद्ध असून आजकालचे तरुणाई मोठ्या प्रमाणावर ब्रॅण्डेड कपडे वापरते. जसा कपड्यांचा ब्रँड असतो त्याप्रमाणे त्या कपड्यांची किंमत देखील असते. अगदी काही हजार रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत देखील कपड्यांची किंमत असते.

मध्यमवर्गीय लोक असो किंवा श्रीमंत या सगळ्यांचा ब्रॅण्डेड कपडे वापरण्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या सर्व प्रकारच्या ब्रँडेड कपडे कोणत्या देशामध्ये तयार होतात? कोणत्या देशात असे कपडे तयार करण्याचे कारखाने जास्त आहेत? याबद्दलची महत्त्वाची माहिती या लेखात घेऊ.

 बांगलादेशात तयार होतात सर्व ब्रॅण्डेड कपडे

तुम्हाला वाचून किंवा जाणून आश्चर्य वाटेल की जगामध्ये जेवढे ब्रॅण्डेड कपड्यांचा वापर होतो ते सर्व ब्रॅण्डेड कपडे बांगलादेशातील कामगारांच्या हातून तयार होतात. एवढेच नाही तर आपल्याकडे जे कपडे तयार करण्यासाठी 1000 रुपयांचा खर्च येतो त्या ठिकाणी त्याब्रँडचे कपडे फक्त शंभर रुपयांमध्ये तयार होऊन मिळतात.

जगातील सर्वात मोठे ब्रँड देखील त्यांचे कपडे बांगलादेश या ठिकाणाहूनच तयार करून घेतात. या ठिकाणी कपडे तयार करणाऱ्या कारखान्यांचा विचार केला तर ते 4000 पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे बांगलादेश हे जगातील सर्वात मोठे कपड्यांचे उत्पादन करणारे महत्त्वाचे केंद्र आहे.

 कपड्यांमधील हे टॉप ब्रँड तयार होतात बांगलादेशात

जर आपण कपड्यांच्या क्षेत्रातील ब्रँड पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने एच अँड एम, टॉमी हिल फिगर, कॅप, केल्विन क्लेन, झारा, मॅंगो, आऊटलेट्स बिडी, जिओर्जीओ अरमानी यासारख्या अनेक नामवंत ब्रांडचे कपडे या देशांमध्ये बनतात. यामागील महत्वाचे कारण म्हणजे या ठिकाणी ज्या काही कपड्यांच्या किमती आहेत त्या फार कमी आहेत.

दुसरी जमेचे बाजू म्हणजे कापड उत्पादनामध्ये कौशल्य असलेले कर्मचारी अगदी स्वस्तात या ठिकाणी उपलब्ध आहेत. बांगलादेशातील चितगाव तसेच ढाका आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये साडेपाच हजार पेक्षा जास्त कारखाने असून प्रत्येक दिवसाला सव्वा लाखापेक्षा जास्त टी-शर्ट त्या ठिकाणी तयार केले जातात.

या ठिकाणी जेंट्स आणि लेडीज वेअर अशा दोन्ही प्रकारचे कपडे तयार होतात. या सगळ्या कारणामुळे बांगलादेश हा कपड्यांच्या उत्पादनामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. जर आपण जागतिक पातळीचा विचार केला तर फॅशन ब्रँडमध्ये चीनच्या नंतर बांगलादेश आता जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts