आर्थिक

Education Loan घेणार आहात ? मग ‘या’ 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ! नाहीतर….

Education Loan : शासनाच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी शोषित आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखील शासनाकडून मदत दिली जात आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या योजना राबवल्या जात आहेत.

मात्र असे असले तरी, प्रत्येकालाच उच्च शिक्षणासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळतो असे नाही. यामुळे अनेक विद्यार्थी एज्युकेशन लोन घेत असतात. उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन हा एक चांगला पर्याय ठरतो. खरे तर, देशातील जवळपास सर्वच बँका एज्युकेशन लोन ऑफर करत आहेत.

देशात शिक्षण घेण्यासाठी किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी दोन्हीही परिस्थितींमध्ये बँकेच्या माध्यमातून एज्युकेशन लोन पुरवले जात आहे. दरम्यान आज आपण एज्युकेशन लोनसंदर्भात काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आज आम्ही एज्युकेशन लोनबद्दल अशा 5 गोष्टी सांगणार आहोत ज्या एज्युकेशन लोन घेणाऱ्या प्रत्येकालाच माहिती असणे महत्त्वाचे आहे.

Education Loan ला अर्ज करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

सिबिल स्कोर चांगला पाहिजे : खरे तर आपल्या देशात होम लोन, पर्सनल लोन, कार लोन इत्यादी लोन देतांना बँकेच्या माध्यमातून सिबिल स्कोर चेक केला जातो. एज्युकेशन लोन साठी देखील हा स्कोर तपासला जातो. हा स्कोर 300 ते 900 दरम्यान असतो. ज्या लोकांचा स्कोर 750 पेक्षा अधिक असतो अशा लोकांना सहजतेने कर्ज मिळतो.

या लोकांना कमी व्याज दरात कर्ज दिले जाते. जर तुम्हाला एज्युकेशन लोन घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने आतापर्यंत कोणत्याच प्रकारचे लोन घेतलेले नसेल आणि त्याचा सिबिल मायनसमध्ये असेल तर असे विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांचा सिबिल स्कोर दाखवावा लागू शकतो. सिबिल स्कोर चांगला असेल तर कमी व्याजदरात एज्युकेशन लोन मिळतं.

व्याज दर कसे असतात : जर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला व्याजदराबाबत या गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे. शैक्षणिक कर्ज घेताना तुम्ही फिक्स्ड आणि फ्लोटिंग रेट यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता. आता आपण या दोघांचा फरक समजून घेऊया.

फिक्स रेट हे असे व्याजदर असते जे तुमच्या संपूर्ण कर्ज कालावधीमध्ये स्थिर असतात. जे व्याजदर संपूर्ण लोन टेन्युअर मध्ये वाढत नाही तसेच कमी देखील होत नाहीत. पण फ्लोटिंग दर बाजारानुसार बदलतात. म्हणजे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट हे कमी सुद्धा होऊ शकतात आणि वाढू सुद्धा शकतात.

कर्ज वाटप : हा एक महत्त्वाचा घटक आहे. खरंतर शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला बँकेशी याबाबत विस्तृत चर्चा करणे आवश्यक आहे. कर्ज वाटप म्हणजेच लोन डिस्बर्समेंट कसे होणार ए एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी संबंधित बँकेला विचारणे आवश्यक ठरते. कारण की, काही बँका ते थेट तुमच्या कॉलेजला पाठवतात, तर काही तुम्हाला देतात. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही बँकेतून एज्युकेशन लोन घेण्यासाठी गेला तर अर्ज करताना सर्वप्रथम तुम्ही कर्ज वाटपाबाबत सविस्तर माहिती विचारणे आवश्यक आहे.

पालकांना सह-अर्जदार बनवा : जर तुम्हाला एज्युकेशन लोन लवकरात लवकर मिळवायचे असेल तर तुमच्या पालकांना तुम्ही सह अर्जदार बनवले पाहिजे. असे केल्याने तुम्हाला लवकरात लवकर एज्युकेशन लोन मंजूर होऊ शकते. जर पालक तुमचे सह-अर्जदार म्हणून कर्जात सामील झाले तर ती तुमच्यासाठी चांगली गोष्ट असते.

यामुळे तुम्हाला मोठे कर्ज मिळण्याची शक्यता वाढतेच, परंतु कमी व्याजदर आणि परतफेड करण्यासाठी अधिक वेळही बँकेकडून मिळू शकतो. तथापि व्याजदर, लोन अमाऊंट, लोन टेन्युअर या सर्व गोष्टी बँकेच्या अधिपत्याखाली येतात. यामुळे एका घटकामुळे व्याजदर कमीच होईल असे नाही. पण पालक सह अर्जदार राहिले तर लोन मिळण्याची शक्यता निश्चितच वाढते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts