आर्थिक

Atal Pension Scheme : चर्चा तर होणारच ! ‘या’ लोकांना सरकार देणार दरमहा 10 हजार रुपये ; जाणून घ्या सविस्तर

Atal Pension Scheme : तुम्ही देखील येणाऱ्या काळासाठी तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा विचार करून आर्थिक बचत करण्याची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला या लेखामध्ये आज एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमच्या येणाऱ्या काळासाठी मोठी बचत करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही योजना केंद्र सरकार राबवत आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. चला मग जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आम्ही या लेखात तुम्हाला आज अटल पेन्शन योजनेबद्दल माहिती देत आहोत. या योजनेंतर्गत जर तुम्ही दरमहा थोडीशी रक्कम गुंतवली तर 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल.  दुसरीकडे जर पती-पत्नीने यामध्ये खाते उघडले तर दोघांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळू शकते. केंद्र सरकारच्या या योजनेचा उद्देश असंघटित कुटुंबांना भक्कम आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.

18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतो.

यामध्ये तुम्हाला किमान 1000 आणि कमाल 5000 रुपये पेन्शन मिळते.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, तुम्हाला ऑटो डेबिटची सुविधा मिळते, म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून गुंतवणुकीची रक्कम आपोआप कापली जाईल. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही.

दुसरीकडे, जर काही कारणास्तव एखाद्या लाभार्थीचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला, तर अशा स्थितीत पत्नीला योजना सुरू ठेवावी लागते आणि वयाच्या 60 नंतर तिला पेन्शन मिळते. जर पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर हे पैसे नॉमिनीला दिले जातात.

हे पण वाचा :-  iPhone 14 Offers : ग्राहकांची मजा ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे आयफोन 14 ; ऑफर पाहून वाटेल आश्चर्य

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts