आर्थिक

एटीएम मशिनमध्ये एटीएम कार्ड अडकले? टेन्शन नका घेऊ… या गोष्टी करा

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  व्यवहार करताना अनेकदा एटीएममध्ये चुकीची माहिती टाकल्याने कार्ड अडकते, तसेच अचानक वीजपुरवठा खंडित झाला तसेच इतर तांत्रिक समस्येमुळे कार्ड एटीएममध्ये अडकू शकते.(ATM card stuck in ATM machine)

जर यदाकदाचित तुमच्यासोबत असे काही घडले तर घाबरून जाऊ नका. तुमचं डेबिट कार्ड एटीएम मशिनमध्ये अडकलं तर तुम्ही ताबडतोब बँकेला कळवावं.

बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून हे कोणत्या शहरात आणि कोणत्या मशीनवर घडलं आहे ते सांगणं आवश्यक आहे. तुम्ही कस्टमर केअरला याबाबत सांगाल, तेव्हा तेथून तुम्हाला दोन पर्याय दिले जातील.

पहिला पर्याय म्हणजे कार्ड रद्द करणं. त्यानंतर नवीन कार्डसाठी अर्ज केल्यास तुम्हाला 7-8 दिवसात ते मिळेल. जर ते एटीएम मशीन त्याच बँकेचं असेल ज्यामध्ये तुमचे खाते आहे,

तर तुम्हाला तुमचं कार्ड अगदी सहज परत मिळेल दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यास दुसरा मार्ग आहे. सर्व बँका त्यांची अडकलेली कार्डे ज्या बँकांमध्ये ती कार्ड जारी केली जातात त्यांना पाठवतात.

म्हणजेच, ज्या बँकेचं कार्ड त्याच बँकेला पाठवण्यात येईल. अशा पद्धतीनं तुमचं कार्ड तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत परत मिळवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts