आर्थिक

ATM Services : एटीएममधून पैसे काढताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, अन्यथा खाते होऊ शकते रिकामे !

ATM Services : एटीएममधून पैसे काढण्याऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही एटीएममधून पैसे काढताना थोडासा निष्काळजीपणा तुमचे मोठे नुकसान करू शकतो. होय, स्कॅमर तुमच्या या चुकीचा फायदा घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. अशा घटना दररोज उघडकीस येत आहेत आणि त्याची जाणीव असूनही आपण या चुका पुन्हा-पुन्हा करतो.

अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एटीएम फसवणूक टाळायची असेल आणि तुमचे खाते सुरक्षित ठेवायचे असेल, तर तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावे लागेल. आजच्या या बातमीत आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत ज्या एटीएम वापरताना होणार्‍या फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करू शकतात. चाल या टिप्स जाणून घेऊया.

एटीएममधून पैसे काढताना वापरा ‘या’ टिप्स 

एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आणि एटीएमच्या आत जाताच, सर्वप्रथम तुम्हाला आजूबाजूला काही छुपे कॅमेरे आहेत का हे तपासावे लागेल. पैसे काढण्यापूर्वी तुम्ही एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासा. अनेक वेळा, फ्रॉड लोकं कार्ड स्लॉट्सभोवती कार्ड रीडर चिप्स बसवतात, ज्यामुळे एटीएम कार्ड डेटा आणि पिन कोडची माहिती चोरली जाऊ शकते.

-तुमचा एटीएम पिन गुन्हेगारांना माहित नसल्यास, त्यांच्या तुमच्या खात्यात प्रवेश करणे कठीण होते. अशा परिस्थितीत एटीएम पिनचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा. लक्षात ठेवा की तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला आहात आणि तेथे दुसरी कोणतीही व्यक्ती नसावी. इतर कोणी तेथे उपस्थित असल्यास, त्याला बाहेर जाण्यास सांगा किंवा पिन त्याला दिसणार नाही याची काळजी घ्या. पिन टाकताना, एटीएम कीबोर्ड आपल्या हाताने झाकून ठेवा आणि शक्य तितक्या मशीनच्या जवळ उभे रहा. जेणेकरून कोणीही तुमचा पिन पाहू शकणार नाही

-घाईगडबडीत किंवा आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्यासाठी अनेक वेळा आपण आपले एटीएम कार्ड आणि पिन आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना देतो. अशी चूक टाळली पाहिजे. आजकाल अशा घटनाही उघडकीस येत आहेत ज्यात जवळचे लोकच फसवणूक करतात. एखाद्याला एटीएम कार्ड द्यायचे असल्यास कार्डचा पिन ताबडतोब बदला आणि व्यवहारांवर लक्ष ठेवा.

-एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेणे हानिकारक ठरू शकते. पैसे काढायला थोडा जास्त वेळ लागला तरी एटीएमजवळ कोणालाही येऊ देऊ नका आणि कार्ड आणि पिन विसरलात तरीही त्यांना सांगू नका.

-एटीएममधून पैसे काढल्यानंतर कॅन्सल बटण दाबणे हा देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही खात्री बाळगू शकता की तुमचा व्यवहार पूर्ण झाला आहे आणि इतर कोणीही तुमच्या कार्डची माहिती पाहू शकणार नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, स्क्रीनवर ‘वेलकम’ दिसते आणि कार्ड स्लॉटमधील प्रकाश देखील चमकू लागतो.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts