आर्थिक

Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज !

Post Office : पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथे पैसे सुरक्षित राहतात आणि परतावाही चांगला मिळतो. अशीच एक योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC). आज आपण या योजनेचे फायदे तसेच या योजनेवर मिळणार परतावा याबद्दल जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सरकारद्वारे चालवले जाते. त्याचा व्याजदर सरकार दर तिमाहीत सुधारित करतो. सध्या सरकारकडून NSC वर 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत गुंतवणुकीचा फायदा असा आहे की, चांगल्या परताव्यासह तुम्हाला आयकर सवलतीचाही लाभ मिळतो.

जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात NSC मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर त्याला आयकर कलम 80C अंतर्गत त्यावर सूट मिळू शकते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. खाते उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत ANS बंद झाल्यास, कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाहीत फक्त गुंतवणुकीची रक्कम दिली जाईल.

FD पेक्षा जास्त व्याज

सध्या सरकारकडून NPS वर 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, बँकेतील 5 वर्षांच्या कर बचत एफडीवर व्याज दर 7 ते 7.5 टक्के आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, करबचत एफडीवर बँक एफडीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.

1000 रुपयांपासून गुंतवणूक सुविधा!

तुम्ही NPS मध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. येथे जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. NPS मध्ये गुंतवणूक ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमातून करता येते.

ऑफलाइन गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल आणि तुम्ही पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन गुंतवणूक करू शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts