आर्थिक

SBI Fixed Deposit Schemes : एसबीआयच्या सार्वधिक परतावा देणाऱ्या जबरदस्त स्कीम, काही काळातच करतील श्रीमंत!

SBI Fixed Deposit Schemes : SBI कडे अशा अनेक बचत योजना आहेत, ज्या लोकांना श्रीमंत बनवण्याचे काम करत आहेत. SBI कडे एकापेक्षा एक योजना आहेत. ज्यांचा परतावा देखील खूप आकर्षक आहे. आज आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. SBI ची अमृत कलश, SBI We care, SBI ग्रीन डिपॉझिट, यांसारख्या अनेक योजनांवर 7.9 टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळत आहे.

SBI ‘अमृत कलश’ योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते FD वर 400 दिवसांसाठी 7.6 टक्के दराने व्याज देते. अमृत ​​कलश स्पेशल एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याजदर मिळेल. तुम्ही या योजनेत 31 मार्च 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकता. ही SBI ची विशेष FD योजना आहे.

WeCare योजनेत फक्त ज्येष्ठ नागरिकच गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. या योजनेअंतर्गत 5 ते 10 वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची एफडी मिळत आहे. यामध्ये 3.5 ते 7.5 टक्के व्याज मिळते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन टर्म डिपॉझिटमधील SBI ग्राहकांना 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या कालावधीसाठी 7.15 टक्के दराने व्याज मिळते. याशिवाय ग्राहकांना 2222 दिवसांच्या मुदतीवर 7.40 टक्के दराने व्याज मिळत आहे. सामान्य नागरिकांबद्दल बोलायचे झाले तर या लोकांना 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या कालावधीत 6.65 टक्के दराने व्याज मिळत आहे. बँक 2222 दिवसांच्या कालावधीसह किरकोळ ठेवींवर 6.40 टक्के ऑफर करते.

SBI च्या या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही फक्त एक वर्ष आणि दोन वर्षांची योजना आहे. SBI या स्कीममध्ये, सामान्य ग्राहकांना 2 वर्षांच्या ठेवींवर म्हणजेच FD (फिक्स्ड डिपॉझिट) वर 7.4 टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर ७.९० टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.60 टक्के व्याज मिळत आहे.

एसबीआय ॲन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. या योजनेत ठेवीदाराला दरमहा मूळ रकमेच्या काही भागासह व्याज दिले जाते. हे व्याज बँकेच्या मुदत ठेवी म्हणजेच FD च्या बरोबरीचे आहे. ॲन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा केले जातात.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts