आर्थिक

बाबा रामदेव यांच्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 6 महिन्यात दिला बंपर परतावा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का हा स्टॉक ?

Share Market Tips : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे अपडेट आहे. ही अपडेट बाबा रामदेव यांच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी अधिक खास राहणार आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून चांगला बंपर परतावा मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पतंजली फूड्सच्या शेअर्सने 6 डिसेंबर 2023 रोजी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. आज या कंपनीचे शेअर शेअर बाजारात आपल्या ऑल टाईम हाय वर पोहचले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यांच्या काळात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत.

आज या कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली. Patanjali Foods Share च्या किंमती प्रति शेअर 1584.95 रुपयांवर पोहोचली. ही या शेअरची आतापर्यंतचा हायस्ट प्राईस आहे. कंपनीची यापूर्वीची हाय लेव्हल ही 26 जूनला नोंदवण्यात आली होती. त्या दिवशी Share च्या किंमती प्रति शेअर 1519.65 वर पोहचल्या होत्या.

कंपनीने सहा महिन्यात दिला बंपर परतावा

बाबा रामदेव यांच्या या कंपनीने गेल्या सहा महिन्यांच्या काळात चांगली चमकदार कामगिरी केली आहे. Patanjali Foods ने गेल्या सहा महिन्यात 55% पेक्षा अधिकचे रिटर्न दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीचा कंपनीचा शेअर 6 जून 2023 ला 1031 रुपयांवर ट्रेड करत होता. तर आज अर्थातच 6 डिसेंबर 2023 ला हा स्टॉक 1584.95 रुपयांवर पोहोचला आहे.

तसेच, गेल्या 8 महिन्यांचा विचार केला असता या काळात कंपनीने 80 टक्क्यांहून अधिकचे रिटर्न देण्याची किमया साधली आहे. हा शेअर 28 मार्चला 881.75 रुपयांवर होता पण आज तो 1584.95 रुपयांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये 80 टक्के उसळी आली आहे. यामुळे या कंपनीवर विश्वास दाखवणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या काही महिन्यांपासून चांगला परतावा मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे वाढत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts