Bajaj Emi Card:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनेक वस्तूंची शॉपिंग करायची हौस असते. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच स्मार्टफोन, वाशिंग मशीन किंवा फ्रिज अशा बऱ्याच वस्तू आपल्याला खरेदी करायचे असतात. परंतु आपल्याकडे खरेदी करता येईल इतका पैसा कायमच असतो नाही.
त्यामुळे बऱ्याचदा पैशाअभावी मनाचा हिरमोड होतो. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून तुमच्याकडे पैसे नसतील तरी तुम्ही बजाज ईएमआय कार्ड च्या माध्यमातून हप्त्यांवर कुठल्याही वस्तूची खरेदी करू शकतात. तुम्ही एखाद्या वस्तूची खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंट तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये करण्याची सुविधा या बजाज ईएमआय कार्डच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे या लेखांमध्ये आपण बजाज ईएमआय कार्ड बद्दलची संपूर्ण माहिती घेऊ.
बजाज ईएमआय कार्ड म्हणजे नेमके काय?
हे कार्ड क्रेडिट कार्ड सारखेच असते व या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी एक निश्चित असा क्रेडिट दिला जातो. अर्थातच या कार्डच्या माध्यमातून मिळणारा लिमिट हा तुमच्या सिबिल स्कोर वर अवलंबून असतो. कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हव्या त्या वस्तूची तुम्ही शॉपिंग करू शकता व महिन्याला हप्त्यामध्ये ठराविक रक्कम भरू शकतात.
हे एक डिजिटल कार्ड असून या माध्यमातून तुम्ही टेलिव्हिजन पासून ते फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच अनेक जीवनावश्यक उत्पादने देखील घेऊ शकतात. विशेष म्हणजे या कार्डाच्या माध्यमातून तुम्ही बजाजच्या पार्टनर स्टोअर मधून गरजेनुसार तुम्ही खरेदी करू शकतात आणि तीन ते 24 महिन्याच्या कालावधीमध्ये ईएमआय भरू शकतात.
बजाज फिनसर्व किंवा बजाज ईएमआय कार्ड करता तुम्हाला किती शुल्क लागते?
या कार्ड करता तुम्हाला एकूण 599 रुपये जीएसटी सह द्यावे लागतात. तसेच यामध्ये वार्षिक फी सुद्धा आकारली जाते. समजा एक वर्षापर्यंत जर तुम्ही या कार्डचा वापर केला नाही तर तुम्हाला 189 रुपये चार्ज भरावा लागतो. परंतु एक वर्षाच्या आत मध्ये जर तुम्ही या कार्डचा वापर केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची वार्षिक फी आकारली जात नाही.
बजाज ईएमआय कार्ड साठीची पात्रता आणि कागदपत्रे
याकरिता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे वय 21 वर्षापेक्षा जास्त आणि 65 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. असेच तुमचे पॅन कार्ड व आधार कार्ड आणि बँक अकाउंट डिटेल्स तुमच्या मोबाईल क्रमांकाची लिंक लागते.
या कार्डसाठी अर्ज कसा कराल?
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला www.bajajfinserv.in या संकेतस्थळावर जायला लागेल. त्या ठिकाणी शॉप ऑन ईएमआय मध्ये ईएमआय कार्ड वर क्लिक करावे लागेल.
2- त्यानंतर होम पेजवर थोड्या खालच्या बाजूला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायला सांगितला असेल त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर थोड्या वेळाने तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो व तो ज्या ठिकाणी ओटीपी टाकायचा जागा आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे व तो व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
3- त्यानंतर नेक्स्ट पेजवर तुम्हाला पॅन कार्ड नुसार तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख तसेच पॅन कार्ड नंबर आणि तुमचा रेसिडेन्शिअल पिन कोड टाकायचा आहे.( तुम्ही राहत असलेल्या परिसरामध्ये जर या कार्डची सर्विस उपलब्ध नसेल तर तुम्हाला या कार्ड साठी अप्लाय करता येणार नाही व प्रोसेस इथेच थांबवली जाते.)
4- त्यानंतर तुमची डिटेल्स व्हेरिफाय केली जाते व जर तुम्ही कार्ड साठी पात्र आहात की नाही हे तपासले जाते. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला किती रुपये लिमिट पर्यंत कार्ड देण्यात येईल हे सांगितले जाते.
5- हे झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड बटनावर क्लिक करायचे आहे.
6- त्यानंतर नेक्स्ट पेजवर तुम्हाला डीजीलॉकर वरून केवायसी करण्यास सांगितले जाईल व त्यासाठी तिथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर डीजी लॉकर मध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरून तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
7- तुम्ही आधार कार्ड वरून लॉगिन केले असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व सहा अंकी पिन टाकायचा आहे व सबमिट करायचे आहे.
8- त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी येतो व तो ओटीपी टाकून पुढे नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
9- त्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारल्या जातील व त्या तुम्हाला अलाऊ करायचे आहेत.
10- त्यानंतर केवायसी करिता तुम्हाला कोणते कागदपत्रे द्यायचे आहे ते विचारले जाईल. या ठिकाणी तुम्ही आधार कार्डची निवड करू शकतात.
11-
आधार कार्डची निवड केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड दाखवले जाईल व त्यामध्ये तुमचे संपूर्ण माहिती दाखवली जाईल. परंतु यामध्ये जर तुमचा चालूचा पत्ता आणि कायमचा पत्ता वेगवेगळा असेल तर तुम्ही अपडेट अड्रेस वर क्लिक करून नवीन पत्ता तुमचा बदलू शकतात व नंतर कन्फर्म बटन वर क्लिक करायचे आहे.12- नंतर तुम्हाला रिलेशनशिप डिटेल्स म्हणजेच तुम्हाला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव टाकायचे आहे व नंतर प्रोसिड करायचे आहे.
13- नेक्स्ट पेजवर तुम्हाला कार्डचे संपूर्ण समरी दाखवली जाते. यामध्ये तुम्हाला किती लिमिट देण्यात आला आहे किंवा तुम्ही फर्स्ट ट्रांजेक्शन किती रुपयांचे करू शकता हे संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला कळते.
14- त्यानंतर तुम्हाला पेमेंटचा एक पर्याय दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला एकूण 599 पे करायचे आहेत. करता तुम्हाला पे नाऊ या पर्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला यूपीआय किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग यापैकी कोणताही तुमच्याकडे जो पेमेंट मोड असेल तो सिलेक्ट करायचा आहे व 599 रुपये पे करायचे आहेत.
15- आता नेक्स्ट पेजवर तुम्हाला व्ह्यू नाऊ आणि ऍक्टिव्हेट नाऊ असे दोन पर्याय दिसतात. मधील व्ह्यू नाऊ यावर तुम्ही कार्ड बघू शकतात आणि ऍक्टिव्हेट नाऊ या पर्यावर तुम्ही तुमचे कार्ड ऍक्टिव्ह करू शकतात.
16- त्यानंतर तुम्हाला ऍक्टिव्हेट नाऊ या पर्यावर क्लिक करून ई- मॅन्डेट पूर्ण करायचे आहे. याकरिता तुम्हाला नेक्स्ट पेजवर तुमच्या बँकेचे नाव, अकाउंट नंबर, आयएफएससी कोड टाकून तुमचे खाते सेविंग आहे की करंट अकाउंट आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इ मॅनडेट रजिस्ट्रेशन तुम्ही कशाने पूर्ण करणार आहात याची निवड करायची आहे व मोबाईल ओटीपी द्वारे की डेबिट कार्ड ते सिलेक्ट करायचे आहे. शेवटी प्रोसिड बटनावर क्लिक करायचे आहे.
17- त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला बजाज फिनसर्व कार्ड चे संपूर्ण तपशील दाखवला जातो व सर्वात खाली तुम्हाला व्हेरिफाय करण्यासाठी डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग असे दोन पर्याय दिले जातात. यामध्ये डेबिट कार्डचा पर्याय सिलेक्ट करून खाली दिलेले सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने तुमचे इ मॅनडेट पूर्ण होते.
18- त्यानंतर तुमचे कार्ड अप्रूव होते व ऍक्टिव्हेट होते.
या कार्डचा वापर तुम्ही कुठे करू शकतात?
तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या शॉपिंग वेबसाईट मधून खरेदी करण्यासाठी देखील या कार्डचा वापर करू शकतात. यामध्ये तुम्हाला चेकआउट ईएमआय ऑप्शन निवडून या कार्डचे संपूर्ण डिटेल्स टाकायचे असतात व तुम्हाला हवी ती वस्तू तुम्ही ऑनलाईन ईएमआय वर घेऊ शकतात. समजा तुम्हाला ऑफलाइन शॉपिंग करायचे असेल तर तुम्ही दुकानदाराला सांगा की माझ्याकडे बजाज ईएमआय कार्ड आहे. तेव्हा संबंधित दुकानदार बजाज एजंटला बोलून तुमच्या वस्तूला एमआय मध्ये करून देतो व तुम्हाला वस्तू मिळते.