Bajaj Finance FD:- गुंतवणुकीसाठी जे काही पर्याय सध्या उपलब्ध आहेत त्यामध्ये फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव यांना गुंतवणूक सुरक्षिततेच्या चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.
जर आपण फिक्स डिपॉझिट योजना बद्दल पाहिले तर अनेक बँकांच्या वेगवेगळ्या आणि आकर्षक व्याजदर असलेल्या फिक्स डिपॉझिट योजना असून गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणामध्ये बँकेत फिक्स डिपॉझिट करतात. अगदी याच प्रमाणे आता बजाज फायनान्सने देखील
डिजिटल एफडी हा एक एफडी म्हणजेच मुदत ठेवीचा नवीन प्रकार लॉन्च केला असून या एफडीचा कालावधी साधारणपणे 42 महिन्याचा आहे. बजाज फायनान्सने लॉन्च केलेल्या या नवीन एफडी प्रकारांमध्ये गुंतवणूकदारांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत.
बजाज फायनान्स च्या डिजिटल एफडी या प्रकारामध्ये गुंतवणूकदारांना मिळतील हे फायदे
1- संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया– बजाज फायनान्सने लॉन्च केलेल्या या मुदत ठेवीची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एफडी सुरू करण्यापासून तर तिचे व्यवस्थापन करण्यापर्यंत सर्व प्रवास ऑनलाइन पद्धतीने होतो. महत्वाचे म्हणजे ही सर्व प्रक्रिया बजाज फिन्सर्वचे वेबसाईट किंवा एप्लीकेशन वरून डिजिटल पद्धतीने केली जाते.
2- स्पर्धात्मक व्याजदर– बजाज फायनान्सने लॉन्च केलेल्या या डिजिटल एफडीमध्ये एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.85% पर्यंत व्याज दिले जाणार आहे.
3- बजाज फायनान्समधील एफडीची सुरक्षितता– बजाज फायनान्सच्या या एफडीला क्रिसिल आणि आयसीआरए इत्यादी सारख्या संस्थान कडून उच्च प्रतीचे एएए रेटिंग देण्यात आलेले आहे. याचा अर्थ असा होतो की यामध्ये केलेली तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते.
4- आकर्षक परताव्याचा फायदा– बजाज फायनान्स हे आकर्षक व्याजदरांच्या साहाय्याने चांगले परतावे तुम्हाला देऊ शकते. बजाज फायनान्स च्या माध्यमातून
ज्येष्ठ नागरिकांकरिता प्रतिवर्ष 8.85% तर 60 पेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांना 8.60% पर्यंत व्याजदर दिला जाणार आहे. जर आपण या व्याजदराची तुलना नेहमीच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदराशी केली तर तो जास्त आहे.
5- सुलभ कालावधी– बजाज फायनान्स मध्ये मुदत ठेवींवर 12 ते 60 महीने कालावधी दरम्यान सुलभ कालावधी दिला जातो. बजाज फायनान्सच्या माध्यमातून तुम्ही लघुकलीन किंवा दीर्घकालीन आर्थिक ध्येय साध्य करू शकता.
एवढेच नाही तर बजाज फायनान्स च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या आर्थिक योजनांकरिता योग्य आणि साजेसा कालावधी दिला जातो.
6- संपूर्णपणे डिजिटल प्रोसेस– तुमच्या ठेवीची सुरुवात आणि तिचे व्यवस्थापन आणि स्टेटस तुम्ही बजाज फिन्सर्वचे संकेतस्थळ किंवा एप्लीकेशन वरून सहजपणे घेऊ शकता.
7- ज्येष्ठ नागरिकांना मिळतात अतिरिक्त फायदे– बजाज फिन्सर्वच्या या एफडी योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच्या मुदत ठेवीच्या तुलनेत बेसरेट पेक्षा प्रति वर्षे 0.25 टक्क्यांपर्यंतचा अतिरिक्त दर दिला जातो.