आर्थिक

Bandhan Bank Saving Account : ग्राहक होणार मालामाल! बंधन बँकेने केली व्याजदरात ‘इतकी’ वाढ, जाणून घ्या

Bandhan Bank Saving Account : आज प्रत्येक नागरिकाचे बँकेत एक किंवा एकापेक्षा जास्त बचत खाते असते. अनेकजण त्यांचे सर्व पैसे जमा करत असून सर्व बँका बचत खात्यावर व्याज देत असतात. हे लक्षात घ्या की वेगवेगळ्या बँकांचे व्याजदरही वेगवेगळे असते.

अनेकजण गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि उत्तम पर्याय बचत खाते हा आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असणाऱ्या बंधन बँकेने नुकतेच बचत खात्याच्या व्याजदरात वाढ केली असून त्याचा फायदा बँकेच्या ग्राहकांना होईल.

जर तुम्ही जास्त नफ्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना शोधत असल्यास तर तुम्हाला बंधन बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करता येईल. आता या बंधन बँकेने मुदत ठेवींमधील गुंतवणुकीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना फायदा होईल. नवीन व्याजदर 5 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. जाणून घेऊयात नवीन व्याजदर.

ठेवींवर मिळतोय हा व्याजदर

हे लक्षात घ्या की नवीन दर देशांतर्गत बचत खात्यांवर लागू आहेत.ही बँक आपल्या ग्राहकांना 10 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर सर्वात जास्त व्याज देत आहे. यावर ही बँक ७ टक्के इतके व्याज देत आहे. इतकेच नाही तर 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 3% आणि 1 लाख ते 10 लाख रुपयांच्या ठेवींवर 6% व्याज बँकेने उपलब्ध करून दिले आहे.

होईल जास्त कमाई

तसेच 2 कोटी रुपये ते 10 कोटी रुपयांच्या ठेवींवर बँकेच्या ग्राहकांना 6.25 टक्के व्याज देण्यात येत आहे. 10 कोटी रुपये ते 50 कोटी रुपयांच्या ठेवींवर 6.50 टक्के व्याज देण्यात येत आहे. तसेच बचत खात्यावरील व्याजदराची गणना दिवसाच्या शेवटी शिल्लक राहिलेल्या शिलकीच्या आधारे करतात हे लक्षात घ्या. सध्या ही बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 3% ते 7.85% पर्यंत व्याज देत असल्याने बँकेच्या ग्राहकांना जास्त कमाई करता येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts