आर्थिक

Bank Bharti 2024 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरी हवीये?, फक्त करा ‘हे’ काम !

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, या भरतीसाठी अर्ज 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “संसाधन व्यक्ती – 1” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी असेल.

या भरती साठी शैक्षणिक पात्रता देखील महत्वाची असेल, शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :-

-Post Graduate in Business Management/Rural Management or Cooperative Management.

-CAIIB will be added advantage.

ही भरती मुंबई येथे सुरु असून, मुख्य कार्यालय, एमएससी बँक 9 येथे स्थित आहे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई 400 001. या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत. पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.mscbank.com/

या वेबसाईटला भेट देऊ शकता.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts