Bank FD: देशातील सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही मात्र तरीदेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँकांनी मे 2023 मध्ये एफडीच्या व्याज दरात मोठी वाढ केली आहे.
ज्यामूळे ग्राहकांना आता मालामाल होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. यातच तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील तब्बल 4 मोठ्या बँकांनी एफडीच्या व्याजदरात बदल केले आहेत. चला मग जाणून घ्या या चार बँकाबद्दल संपूर्ण माहिती.
या बँकेने अलीकडेच मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर देखील 2 मे पासून लागू झाले आहेत. 1001 दिवसांच्या FD वर बँक सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त 9 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 9.5 टक्के व्याज दिले जात आहे.
ही देशातील प्रसिद्ध बँकांपैकी एक आहे. कोटक महिंद्रा बँकेनेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवे दरही 11 मे पासून लागू झाले आहेत. बँक सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या FD योजनांवर 2.75% ते 7.20% पर्यंत व्याज देत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 3.25% ते 7.70% पर्यंत आहे.
ही बँक FD वर आकर्षक व्याज देखील देत आहे. नवे दर 5 मे पासून लागू झाले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर वाढवण्यात आले आहेत. बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 4% ते 9.1% व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याज दिले जात आहे.
या बँकेने 2 कोटींपेक्षा कमी एफडीचे व्याजदरही वाढवले आहेत. नवे दर 8 मे पासून लागू झाले आहेत. बँक सर्वसामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त 8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 8.5 टक्के व्याज देत आहे.
हे पण वाचा :- IMD Rain Alert : खुशखबर ! उष्णतेपासून मिळणार दिलासा, ‘या’ राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी , जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स