आर्थिक

Bank FD : लवकर करा…! ‘या’ बँकांच्या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; 31 जानेवारीला संपणार मुदत…

Bank FD : गुंतवणुकीची चर्चा होताच एफडीचे नाव डोळ्यासमोर येते. कारण लोकांना एफडीमध्ये सुरक्षित गुंतवणूक मिळते. यासोबतच हमखास परतावाही मिळतो. तुम्हीही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी असू शकते.

खरं तर, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, अनेक बँका विशेष एफडी ऑफर करतात. या मालिकेत सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेची विशेष एफडी योजना या महिन्यात म्हणजेच ३१ जानेवारी रोजी संपणार आहे.

पंजाब आणि सिंध बँकेच्या स्पेशल एफडी धनलक्ष्मीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आत काहीच दिवस शिल्लक आहेत, या दोन्ही बँका ४४४ दिवसांची एफडी ऑफर करतात. आता या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 5 दिवसच शिल्लक आहेत. पंजाब आणि सिंध बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्ही या एफडीमध्ये ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकता.

स्पेशल एफडीवरील व्याजदर !

धनलक्ष्मी नावाच्या या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी ४४४ दिवसांचा आहे. या एफडीमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना ७.४ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.९ टक्के आणि अति ज्येष्ठांना ८.०५ टक्के व्याज मिळते.

बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

पंजाब आणि सिंध बँकेला नुकताच एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कर्ज नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय बँकेने सरकारी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. ग्राहक सेवेच्या अभावामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts