आर्थिक

Bank FD Rate: ग्राहकांवर पडणार पैशाचा पाऊस ! ‘या’ 3 बँकांनी वाढवले एफडीवर व्याज ; जाणून घ्या नवीन दर

Bank FD Rate: नवीन वर्षात बचत करण्यासाठी बँक एफडी सर्वात बेस्ट पर्याय आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आरबीआयने रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी आतापर्यंत आपल्या एफडी दर वाढवले आहे. यामुळे ग्राहकांना सध्या एफडीमध्ये बंपर परतावा मिळत आहे.

यातच आता देशातील आणखी तीन बँकांनी एफडी दर वाढवल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे.तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आयडीएफसी फर्स्ट बँक, स्मॉल फायनान्स बँक, जम्मू काश्मीर बँक आणि खासगी क्षेत्रातील आरबीएल बँक यांनी आपल्या एफडी दरात वाढ केली आहे.

IDFC First Bank व्याजदर

या बँकेने 2 कोटींपर्यंतच्या बल्क डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 13 जानेवारीपासून लागू झाले आहेत. 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.30 टक्के ते 7.30 टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर 366 दिवस-399 दिवसांच्या योजनेवर 7.55 टक्के व्याज मिळत आहे. त्याच वेळी, 7-35 दिवसांच्या एफडीवर 5.30 टक्के लाभ दिला जात आहे.

RBL Bank FD व्याजदर

या बँकेने व्याजदरात बदल केला आहे. 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर आता 3.25 टक्के ते 6.25 टक्के व्याज मिळणार आहे. नवे दर 11 जानेवारीपासून लागू झाले आहेत. बँक 453 दिवस ते 725 दिवसांच्या एफडीवर 7.55 टक्के व्याज देत आहे. 241 दिवस ते 364 दिवसांच्या योजनेवर 5.5 टक्के व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ मिळत आहेत. 726 दिवस ते 60 महिन्यांच्या FD वर 7% व्याज मिळत आहे.

Jammu and Kashmir Bank FD व्याजदर

ही देशातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक आहे. अलीकडेच त्यांनी मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले ​​आहेत. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD व्याजात 75 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. 1 वर्षापासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.25% चे कमाल व्याज मिळत आहे. नवे दरही 11 जानेवारीपासून लागू झाले आहेत.

हे पण वाचा :- IMD Alert : सावध राहा ! 16 जानेवारीपर्यंत 9 राज्यांमध्ये धो धो पाऊस तर 8 राज्यात पसरणार थंडीची लाट ; जाणून घ्या ताजे अपडेट

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts