आर्थिक

Bank FD Rate: प्रजासत्ताक दिनी ग्राहकांची मजा ! ‘या’ 3 बँकांनी वाढवले ​​एफडीवर व्याज ; आता मिळणार ‘इतके’ पैसे

Bank FD Rate:  देशातील सामान्य माणसासाठी बचतीचा सर्वात बेस्ट पर्याय म्हणेज एफडी होय. आज देशातील करोडो नागरिक देशात असणाऱ्या विविध बँकांमध्ये एफडीच्या स्वरूपात पैसे जमा करत आहे. तुम्ही देखील एफडीच्या स्वरूपात भविष्याच्या आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी पैसे जमा करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो आज देशातील तीन मोठ्या बँकांनी ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. या बातमीनुसार आज आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेने एफडीच्या दरात वाढ केली आहे. चला जाणून घेऊया नवीन दरांबद्दल संपूर्ण माहिती.

Axis Bank

अॅक्सिस बँकेनेही एफडीवरील व्याज वाढवले आहे. 7 दिवस ते 29 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 2.75% व्याज मिळत आहे. बँक 3 ते 6 महिन्यांसाठी योजनेवर 3.75 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, पाच ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज मिळत आहे.

ICICI Bank

देशातील खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दरही लागू झाले आहेत. 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर 7.15% व्याज, 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 4.50% व्याज उपलब्ध आहे. सध्या, बँक 15 महिने ते 10 वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज देत आहे.

HDFC Bank

FD देशातील सर्वात मोठ्या बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवे दरही लागू झाले आहेत. याआधीही एचडीएफसी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3% ते 7% व्याज उपलब्ध आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी 3.50% ते 7.55% व्याजाचा लाभ मिळेल. 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी, सामान्य ग्राहकांना 7% आणि सिनियन नागरिकांना 7.75% व्याज मिळेल.

हे पण वाचा :- Vastu Tips 2023: नागरिकांनो ‘ह्या’ गोष्टी जिण्याखाली कधीही ठेवू नका ; नाहीतर आयुष्यात होईल ..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts