Bank FD Rates : जे गुंतवणूकदार सध्या उत्तम परताव्याची योजना शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी कामाची आहे. आज आम्ही देशातील अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या आपल्या एफडीवर उत्तम परतावा ऑफर करत आहेत.
FD ही देशातील बहुतांश लोकांची गुंतवणुकीची पहिली पसंती आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशातच तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या तीन बँकां उत्तम परतावा ऑफर करत आहेत. कोणत्या त्या बँका पाहूया…
बँक ऑफ बडोदा
ही बँक मुदत ठेवींवर सर्वाधिक ७.२५ टक्के व्याज देत आहे. ही बँक पाच वर्षांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज देत आहे. तर तीन वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. लक्षात घ्या बँक जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करते.
स्टेट बँक ऑफ इंडिया
सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD वर सर्वाधिक व्याजदर ७.१ टक्के आहे. ही बँक तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर ६.८ टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के व्याजदर देत आहे.
बँक ऑफ इंडिया
तुम्हाला बँक ऑफ इंडियाच्या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की ही बँक FD वर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज देत आहे. या बँकेत तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर ६.५० टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर ६.५० टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर ६ टक्के व्याजदर मिळत आहेत.